Download App

Israel–Hamas War : इस्त्रायलकडून हल्ले सुरूच, गाझापट्टीत बॉम्बवर्षाव, 166 जणांचा मृत्यू

  • Written By: Last Updated:

Israel–Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. गाझामध्ये लपलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना पकडण्यसाठी इस्त्रायलने (Israel) जंगजंग पछाडलं आहे. रविवारी, इस्रायलने गाझा पट्टीतील 200 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ले केलं. या हल्ल्यात आतापर्यंत 166 जणांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत. या युद्धात 14 इस्रायली सैनिकही मारले गेल्याचे वृत्त आहे.

बळीराजाची चिंता वाढली, ऐन थंडीत अवकाळी पावसाची शक्यता, IMD कडून ‘या’ राज्यांना अलर्ट 

पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, सतत इस्त्रायलकडून हल्ले सुरू आहेत. आतापर्यंत २०० हून अधिक लोक मारले गेले. गाझा पट्टीच्या मध्यभागी असलेल्या माघाझी निर्वासित शिबिरावर रविवारी इस्रायलने हवाई हल्ला केला आहे. या हवाई हल्ल्यात 76 लोक मरण पावले आहेत. माघाझी निर्वासित शिबिरात ठार झालेल्या 70 जणांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे.

Horoscope Today: आज ‘या’ राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता 

रविवारी रात्रीपासून सुरू झालेले इस्रायलचे गाझावरील हल्ले ख्रिसमसच्या सोमवारी सकाळपर्यंत सुरू होते. स्थानिक रहिवासी आणि पॅलेस्टिनी माध्यमांच्या मते, इस्रायलने मध्य गाझामधील अल-बुरेइजमध्ये हवाई आणि जमिनीवर गोळीबार केला.

हल्ल्याच्या एक दिवस आधी संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी गाझामधील कोणतीही जागा सुरक्षित नसल्याचे म्हटले होते. सामान्य नागरिकांवर हल्ले न करण्याचा इशारा सुंयक्त राष्ट्रांनी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला आहे.

दुसरीकडे इस्रायली सैन्याने सांगितले की त्यांनी उत्तर गाझामधील हमासच्या भूमिगत बोगद्याच्या नेटवर्कमधून बंदिवासात मारल्या गेलेल्या पाच इस्रायली ओलिसांचे मृतदेह बाहेर काढले.

इस्रायली लष्कराने सांगितले की त्यांनी गेल्या आठवड्यात शेकडो संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. यापैकी 200 हून अधिक दहशतवाद्यांची चौकशी सुरू आहे. हमास आणि इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांशी संबंधित 700 हून अधिक लोक इस्रायलच्या तुरुंगात कैद आहेत.

हमासच्या स्थानांवरून सैनिकांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केल्याचे इस्रायलने म्हटले आहे. वृत्तानुसार, हमासने उत्तर गाझामधील एका निवासी इमारतीत मोठ्या हल्ल्यासाठी शस्त्रे लपवून ठेवली होती. रविवारी इस्रायली सैन्याने इमारतीला घेरले. झडतीदरम्यान त्यांच्याकडून डझनभर स्फोटके, शेकडो ग्रेनेड आणि गुप्तचर कागदपत्रे जप्त केली.

Tags

follow us

वेब स्टोरीज