बळीराजाची चिंता वाढली, ऐन थंडीत अवकाळी पावसाची शक्यता, IMD कडून ‘या’ राज्यांना अलर्ट

  • Written By: Published:
बळीराजाची चिंता वाढली, ऐन थंडीत अवकाळी पावसाची शक्यता, IMD कडून ‘या’ राज्यांना अलर्ट

Weather Update : गेल्या काही दिवसांपासून डोंगराळ भागात सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे (snowfall) अनेक राज्यांमध्ये थंडी वाढली आहे. काश्मीरच्या मैदानी भागातील बर्फवृष्टीमुळं उत्तर भागात थंडीची लाट सुरू आहे. थंड वाऱ्यांमुळे राजधानी दिल्लीसह एनसीआरमधील लोकांना कडाक्याची थंडी जाणवत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही गारठा वाढला आहे. एकीकडे थंडीचा प्रभाव वाढत आहे तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाची (Unseasonal rain) शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Lok Sabha Election : 2024 चे पंतप्रधान कोण? नरेंद्र मोदी की राहुल गांधी? सर्वेतून धक्कादायक आकडेवारी समोर 

देशभरात थंडीचा प्रभाव दिसू लागला आहे. बहुतांश राज्यांमध्ये कमाल तापमानात सुमारे २ ते ३ अंश सेल्सिअसची घसरण नोंदवण्यात आली आहे. हवामान खात्यानुसार, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये दाट धुके पसरले.

‘या’ राज्यांना अवकाळी पावसाचा इशारा
सध्या देशात जोरदार थंडी पडली असून काही भागात ढगाळ वातावरण आहे. भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा तामिळनाडूमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील ६ दिवस तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये अवकाळी पाऊस पडेल. नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

निवडणुक आयोगाची स्वायत्तता संपली, आयोग सरकारचा गुलाम; प्रकाश आंबेडकरांची टीका

ईशान्येकडील जोरदार वाऱ्यांमुळे, आजपासून 30 डिसेंबर 2023 पर्यंत पुढील 6 दिवस तमिळनाडूच्या किनारी भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी अरुणाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये पावसाची शक्यता आहे.

राजधानीतील तापमानात घट

राजधानी दिल्लीत तापमानात झपाट्याने घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना हुडहुडी जाणवत आहे. रविवारी दिल्लीचे किमान तापमान ७.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील आठवड्यात दिल्ली-एनसीआरमध्ये तापमानात मोठी घसरण होईल आणि दाट धुके पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

राज्यातील जिल्यांना थंडीने गारठले
ढगाळ वातावरण निवळल्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून थंडी वाढली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना थंडीने गारठले आहेत. मुंबई आणि पुण्यातही तापमानात घट होत आहे.
राज्य गारठले (किमान तापमान अंश सेल्सिअस) : पुणे 11.3, धुळे 8.5, जळगाव 12.6, कोल्हापूर 16.3, महाबळेश्वर 15, नाशिक 13.6, निफाड 9.1, सांगली 14.2, सातारा 13.4, सोलापूर 15.19, छत्रपती संभाजीनगर 11.8, नांदेड 15, परभणी 12.2, अकोला 13.3, अमरावती 13, बुलडाणा 14, ब्रह्मपुरी 13, चंद्रपूर 11.2, गडचिरोली 9.8, गोंदिया 12.2, नागपूर 13.13, वर्धा 13, वाशिम 12.2.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube