Israeli Attack On Lebanon : गेल्या काही दिवसांपासून इस्रायलकडून (Israeli) लेबनॉनवर (Lebanon) हवाई हल्ले करण्यात येत आहे. त्यामुळे आता अमेरिका, फ्रान्स, कॅनडा आणि ब्रिटनच्या सरकारने लेबनॉनमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना लवकरात लवकर लेबनॉन सोडण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये (Hezbollah) काही तरी घडणार आहे का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
जेव्हा पर्यंत हवाई प्रवास सुरु आहे तेव्हापर्यंत नागरिकांनी लेबनॉन सोडावा असा आवाहन अमेरिकेच्या (America) परराष्ट्र विभागाने केला आहे. येत्या काही दिवसात लेबनॉनमध्ये सुरक्षेची स्थिती बिघडू शकते. असा अंदाज देखील अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने व्यक्त केला आहे.
काही दिवसापूर्वी इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख कमांडर अहमद वहबी ठार झाला होता. या हल्ल्यात आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू झाला आहे. युद्ध मंत्रिमंडळात बोलताना गेल्या आठवड्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी हमासनंतर आता हिजबुल्लाशी थेट मुकाबला करण्याची वेळ आली आहे अशी घोषणा केली होती तसेच त्यांनी उत्तरेकडील भागात लोकांचे पुनर्वसन करण्याची देखील घोषणा केली होती. या घोषणेनंतर इस्रायलकडून लेबनॉनवर सातत्याने हवाई हल्ले होत आहे.
चार दिवसापूर्वी लेबनॉनमध्ये पेजर आणि वॉकी-टॉकीमध्ये स्फोट झाला होता ज्यामध्ये हिजबुल्लाहच्या अनेक कमांडरांचा मृत्यू झाला होता. या स्फोट पाठीमागे इस्रायल असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अद्याप याबाबत इस्रायलकडून कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही. या स्फोटमध्ये 4 हजारांहून अधिक जखमी झाले होते.
तर दुसरीकडे हिजबुल्लाहही इस्रायलवर पलटवार करत आहे. इस्रायली माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलमध्ये 100 हून अधिक रॉकेट डागले मात्र या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शिन बेट आणि इस्रायली हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे बहुतेक हल्ले हवेत नष्ट करण्यात आले अशी माहिती इस्रायली माध्यमांनी दिली आहे.
अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन सतर्क
गेल्या काही दिवसांपासून हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यात वाढत असलेल्या संघर्षामुळे अमेरिकेसह अनेक देश चिंतेत आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने शनिवारी रात्री लेबनॉनमध्ये राहणाऱ्या अमेरिकन लोकांना लवकरात लवकर देश सोडण्याचे आवाहन केले तर फ्रान्स, ब्रिटन आणि कॅनडासह अनेक देशांनीही असाच सल्ला आपल्या नागरिकांना दिला आहे.
राणी मुखर्जीने कॅन्सरग्रस्त मुलांसोबत साजरा केला वर्ल्ड रोज डे
लेबनॉनवरून हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे अमेरिकेसह अनेक देश चिंतेत आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने शनिवारी रात्री लेबनॉनमध्ये राहणाऱ्या अमेरिकन लोकांना लवकरात लवकर देश सोडण्याचे आवाहन केले. अमेरिकेने यामागे इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्षाचे कारण सांगितले आहे.