नेतन्याहू यांना खटला न चालवता गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे; कॉंग्रेस खासदाराचे वादग्रस्त विधान

  • Written By: Published:
नेतन्याहू यांना खटला न चालवता गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे; कॉंग्रेस खासदाराचे वादग्रस्त विधान

Rajmohan Unnithan : गेल्या महिन्यापासून इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्यातील रक्तरंजित संघर्षात 11,240 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी इस्रायलने गाझा पट्टीतील अल शिफा रुग्णालयाचा ताबा घेतला. इस्रायलच्या लष्करी मोहिमेमुळे गाझामधील दोन तृतीयांश लोक बेघर झाले. अजूनही गाझा पट्टीवर इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत. या सगळ्या घडामोडींदरम्यान केरळमधील काँग्रेस खासदार राजमोहन उन्नीथन (Rajmohan Unnithan) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) हे युद्ध गुन्हेगार आहेत. त्यांना कोणत्याही न्यायालयीन खटल्याशिवाय, गोळ्या घातल्या पाहिजेत, असं वक्तव्य केलं.

Karnataka Politics : कर्नाटकात सावरकर vs नेहरू! सावकरांचा फोटो हटणार ? नेमकं काय घडलं? 

इस्रायलने गाझा पट्टीत हमासविरुद्ध युद्ध घोषित केले आहे. इस्रायलने गेल्या महिन्याभरापासून गाझावर हल्ले केलेत. इस्रायलच्या या कृतीला विरोधही होत आहे. आता खासदार राजामोहन उन्नीथन यांनी विरोध केला. केरळमधील कासारगोड येथे पॅलेस्टाईन युनिटी रॅलीमध्ये सहभागी झाले असतांना त्यांनी नेतन्याहू यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धानंतर युद्ध गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी न्यूरेमबर्ग ट्रायल नावाची पद्धत वापरली गेली. न्युरेमबर्ग चाचण्यांमध्ये, युद्ध गुन्हेगारांना कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. आता न्युरेमबर्ग मॉडेल पुन्हा लागू करण्याची वेळ आली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे युद्ध गुन्हेगार म्हणून जगासमोर उभे आहेत. आता नेतन्याहू यांच्याविरोधात कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता त्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची हीच वेळ आहे. कारण, त्यांनी क्रूरतेच्या कळस गाठला , असं उन्नीथन म्हणाले.

Pune News : विरोधाचा ‘आवाज’ वाढला! बागेश्वर बाबांविरोधात ‘अंनिस’ मैदानात; कारवाईची मागणी 

उन्नीथन म्हणाले की, गाझा पट्टीवर राज्य करणारी इस्लामिक संघटना हमासने आपली जमीन, लोकांचे रक्षण करण्यासाठी शस्त्रे हाती घेतली आहेत. ते दहशतवादी नाहीत. जर कोणी हमासला दहशतवादी दाखवत असेल तर आता त्यांच्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया देण्याची वेळ आली आहे.

इस्रायल-हमास युद्धादरम्यान, केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीने (KPCC) पॅलेस्टिनी नागरिकांच्या समर्थनार्थ 23 नोव्हेंबर रोजी कोझिकोड बीचवर रॅलीचे आयोजन केले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमेरिका मुस्लिमांना लक्ष्य करतेय
राजमोहन उन्नीथन इथेच थांबले नाहीत, तर बेंजामिन नेतन्याहू यांच्याशिवाय अमेरिकेलाही लक्ष्य केले. ते म्हणाले, अमेरिकेने इराकमध्ये दहा लाख अरब आणि मुस्लिम मारले. अफगाणिस्तानात सत्तर लाख मुस्लिम मारले, कोरिया आणि व्हिएतनाममध्ये निरपराधांना मारले पण अमेरिका अजूनही युद्धावर समाधानी नाही, असं ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube