लेबनॉनमध्ये पेजरनंतर वॉकीटॉकी अन् सौर यंत्रणेत स्फोट, 300 जखमी
Lebanon Explodes : पेजरमध्ये झालेल्या स्फोटानंतर आज पुन्हा एकदा लेबनॉनमध्ये (Lebanon) अनेक स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, आज एकाच वेळी वॉकी-टॉकी (Walkie-Talkie) आणि घरांच्या सौर यंत्रणांमध्ये स्फोट झाले आहे. या स्फोटमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला 300 हून अधिक जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
लेबनॉनच्या दक्षिणेकडील आणि बेरूतच्या दक्षिण उपनगरात स्फोट झाला असल्याची माहिती लेबनॉनकडून देण्यात आली आहे. माहितीनुसार, पेजर स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांवर अंत्यसंस्कार केले जात असताना अचानक स्फोट झाला त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती.
17 सप्टेंबर रोजी हिज्बुल्लाच्या सैनिकांकडून वापरण्यात येत असलेल्या पेजरमध्ये अचानक स्फोट झाल्याने 1000 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. माहितीनुसार,या स्फोटमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला होता. सध्या या हल्ल्यामागे इस्रायलचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत मात्र आतापर्यंत इस्रायलने या प्रकरणात कोणतेही भाष्य केलेला नाही.
लेबनॉनच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्रायलची गुप्तचर संस्था मोसादने मंगळवारच्या स्फोटांपूर्वी हिजबुल्लाहने खरेदी केलेल्या पेजरमध्ये स्फोटके ठेवली होती. या हल्ल्यात मृतांची संख्या दोन मुलांसह 12 झाली असल्याची माहिती लेबनॉनचे आरोग्य मंत्री फिरास अबियाद यांनी दिली आहे.
गणेश विसर्जन होताच अजित पवार ॲक्शन मोडमध्ये, ‘देवगिरी’वर आमदारांना हजर होण्याचे आदेश
गेल्या वर्षी 8 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला तेव्हापासून हिजबुल्ला आणि इस्रायली सैन्यामध्ये गोळीबार होत आहे. आतापर्यंत या गोळीबारात दोन्ही बाजूंच्याशेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक लोक विस्थापित झाले आहेत.
जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचा पहिला टप्पा संपला, 24 जागांवर 58.85 टक्के मतदान