मोठी बातमी! इस्रायलला पुन्हा धक्का, हिजबुल्लाहने कॅप्टनसह 8 सैनिकांना केले ठार

मोठी बातमी! इस्रायलला पुन्हा धक्का, हिजबुल्लाहने कॅप्टनसह 8 सैनिकांना केले ठार

Israel Hezbollah Conflict : सर्वांना धक्का देत इराणने (Iran) इस्रायल (Israeli) मोठा मिसाईल हल्ला केल्याने जगात एका नवीन युद्धाला सुरुवात झाली आहे. इराणने 01 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर 200 पेक्षा जास्त मिसाईल डागून सर्वांना धक्का दिला तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

या बातमीनुसार आता लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहने (Hezbollah) इस्रायली कॅप्टनसह आठ सैनिकांना ठार केले आहे. इस्रायली लष्करानेही आपल्या सैनिकांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. बॉम्ब हल्ल्यात आठ सैनिकांना मृत्यू झाला असल्याची माहिती इस्रायलकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे हिजबुल्लाने आपल्या लष्करी रणनीतीने इस्रायली सैनिकांचा पराभव केला असल्याचा दावा केला आहे.

इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टन इटान इत्झाक ओस्टर बुधवारी हिजबुल्ला विरुद्ध लढताना मारले गेले मात्र इस्रायलकडून याबाबत अधिक तपशील देण्यात आलेली नाही. दोन दिवसापूर्वी इस्रायलने हिजबुल्लाह विरुद्ध जमिनीवर युद्ध करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर इस्रायली सैनिक लेबनॉनमध्ये दाखल झाले होते.

तर दुसरीकडे हिजबुल्लाहने मोठा दावा करत लेबनॉनच्या दक्षिण भागात इस्त्रायली सैन्याला स्फोटक यंत्राद्वारे टार्गेट करण्यात आले असल्याचा दावा केला आहे. तसेच इस्त्रायली सैन्य या हल्ल्यासाठी तयार नव्हते त्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत होते असा देखील दावा आता हिजबुल्लाहकडून करण्यात येत आहे.

लेबनॉनमध्ये तब्बल 18 वर्षांनंतर हिजबुल्ला आणि इस्रायलमध्ये जमीनी युद्ध होत आहे. यापूर्वी 2006 मध्ये देखील हिजबुल्ला आणि इस्रायलमध्ये लेबनॉनमध्ये युद्ध झाला होता. ज्यामध्ये हेजबुल्लाहने विजयाचा दावा केला होता.

पूजा खेडकर पुन्हा चर्चेत, आता ‘त्या’ प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली तक्रार

तसेच या युद्धात हेजबुल्लाहचे तेवढे नुकसान होऊ शकले नसल्याची आणि रणनीतीशिवाय युद्ध लढण्याचा निर्णय चुकीचा होता अशी कबुली इस्त्रायलने दिली होती. त्यामुळे यावेळी इस्रायलने हिजबुल्लावर सर्वप्रथम हवाई हल्ला केला आणि आता जमीनी युद्ध करत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube