Pagers Exploded : लेबनॉनमध्ये पेजरचा स्फोट, राजदूतासह हिजबुल्लाहचे 1000 सदस्य जखमी
Pagers Exploded : इराण-समर्थित लेबनीज दहशतवादी गट हिजबुल्लाहचे शेकडो सदस्य संवाद साधण्यासाठी वापरत असलेल्या हॅन्डहेल्ड पेजरचा स्फोट झाल्याने जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार या अपघातात इराणच्या राजदूतासह 1000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये सैनिक आणि डॉक्टरांचा समावेश असल्याची माहिती रॉयटर्सने दिली आहे. इराणच्या मेहर वृत्तसंस्थेनुसार, लेबनॉनमधील इराणचे राजदूत मोजतबा अमानी यांचाही जखमींमध्ये समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरात घडली. हे पेजर हिजबुल्लाहच्या सैनिकांनी परस्पर संवादासाठी वापरले होते पण त्यांचा स्फोट झाला.
हिजबुल्लाने या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे तसेच दावा केला आहे की, सर्व पेजर जवळजवळ एकाच वेळी फुटले. रॉयटर्सला एका हिजबुल्लाहच्या अधिकाऱ्याने सांगितले की पेजर स्फोट हा इस्रायलबरोबरच्या जवळपास वर्षभर चाललेल्या युद्धात सर्वात मोठे सुरक्षेचे उल्लंघन आहे.