गणेश विसर्जन होताच अजित पवार ॲक्शन मोडमध्ये, ‘देवगिरी’वर आमदारांना हजर होण्याचे आदेश

  • Written By: Published:
गणेश विसर्जन होताच अजित पवार ॲक्शन मोडमध्ये, ‘देवगिरी’वर आमदारांना हजर होण्याचे आदेश

Ajit Pawar : राज्यात गणेशोत्सव संपला असून आता सर्वांचे लक्ष विधानसभेकडे लागले आहे. माहितीनुसार, येत्या काही दिवसात केंद्रीय निवडणूक आयोग राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे मात्र त्यापूर्वी राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सर्वच आमदारांना तातडीने देवगिरी (Devagiri) बंगल्यावर बैठकीसाठी बोलावलं असल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा राजकीय भूकंप येणार का? याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावण्यात येत आहे.

तर दुसरीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार कसा करावा तसेच महायुतीमधील इतर घटक पक्षांसोबत जुळवून कसं घ्यायचं संदर्भात सूचना देण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीत काय चर्चा होणार?

गेल्या काही दिवसांपासुन भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये टीका – टिपण्णी होत असल्याने गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भाजपच्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत जुळवून घ्या अशा सूचना दिल्या आहे तर आता अजित पवार देखील या बैठकीमध्ये या संदर्भात सूचना देऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते महामंडळ वाटपावरून नाराज असल्याने याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे वर्तवण्यात येत आहे.

तसेच नियोजन विभागाच्या माध्यमातून कामांच्या याद्या मागविण्यात आल्या होत्या मात्र जुलै महिन्यापासून आमदारांना निधी देण्यात आला नसल्याने आज या बैठकीमध्ये या विषयावर देखील चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गट कमीत कमी 60 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. काही दिवसापूर्वी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी 80 ते 90 जागांवर निवडणूक लढवण्याचा दावा केला होता.

जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचा पहिला टप्पा संपला, 24 जागांवर 58.85 टक्के मतदान

तर काही मीडिया रिपोर्ट्सनुसार अजित पवार यांनी विधानसभेसाठी 25 उमेदवारांची नावे देखील फायनल केली असून त्या उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश देखील अजित पवार यांनी दिले आहे असा दावा देखील काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube