मोठी बातमी! अमेरिकेतील गोळीबारात इस्त्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू; हल्लेखोराच्या घोषणा

यहुदी म्यूजियमच्या बाहेर इस्त्रायली दुतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

Washington

Washington

Washington Shooting : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधून एक धक्कादायक (Washington Shooting) घटना समोर आली आहे. येथील यहुदी म्यूजियमच्या बाहेर इस्त्रायली दुतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या ठिकाण अमेरिकन ज्युइश कम्युनिटीतर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच वेळी गोळीबाराची घटना घडली.

टाइम्स ऑफ इस्त्रायलच्या रिपोर्टनुसार हल्लेखोराची ओळख पटली आहे. त्याने गोळीबार करत फ्री पॅलेस्टाइन अशा घोषणाही दिल्या होत्या. वॉशिंग्टन पोलीस प्रमुख पामेला स्मिथ यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की दोन्ही कर्मचारी म्यूझियममधील कार्यक्रम संपवून निघाले होते. त्याचवेळी ही घटना घडली.

आम्हाला वाटतं की हा हल्ला एकाच व्यक्तीने केला असावा. तो आता कस्टडीत आहे. गोळीबाराच्या आधी या व्यक्तीला म्यूझियमच्या बाहेर फिरताना पाहिले गेले होते. म्यूझियममधून काही लोक बाहेर पडले तसे त्याने लगेच हँडगन काढून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. गोळीबारानंतर तो म्यूझियमच्या आत गेला त्यावेळी येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी डिटेन केले.

या घटनेवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दुःख व्यक्त केले. यहुदी विरोधात वॉशिंग्टन डीसीमध्ये (Washington DC) होणाऱ्या हत्या आता थांबल्या पाहिजेत. द्वेष आणि कट्टरपणाला अमेरिकेत कोणताही थारा नाही. पीडित परिवारांसोबत आमच्या संवेदना आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी इस्त्रायली कर्मचाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्याची कठोर शब्दांत निंदा केली आहे. हा हल्ला सरळसरळ यहुदी विरोधातील भ्याड हल्ला आहे. यासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही असे रुबियो म्हणाले.

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. अमेरिकी अटॉर्नी जनरल पाम बाँडी यांनी सोशल मीडियावर सांगितले की मी आणि कार्यवाहक अमेरिकी अटॉर्नी जीनिन पिरो कॅपिटल यहुदी संग्रहालयाबाहेरील घटनास्थळी दाखल झालो आहोत. या घटनेनंतर अमेरिकेत खळबळ उडाली आहे. गोळीबाराच्या घटना रोखण्यासाठी अमेरिकी सरकार मात्र पूर्णतः अपयशी ठरले आहे.

Exit mobile version