Trumpet Symbol: शरद पवारांच्या पक्षाला 9 जागांवर फटका; ट्रम्पेटनं लोकसभेसारखा डाव साधला

  • Written By: Published:
Trumpet Symbol: शरद पवारांच्या पक्षाला 9 जागांवर फटका; ट्रम्पेटनं लोकसभेसारखा डाव साधला

Sharad Pawar Party lost For Same Symbol : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं. निकालानंतर आता महायुतीमध्ये सत्तास्थापनेसाठी हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्रिपद कोणाकडं द्यावं, याबाबत महायुतीतील मित्रपत्रांमध्ये चर्चा चालू आहे. तर, दुसरीकडे राज्यातील जनतेने महाविकास आघाडीकडे पाठ फिरवलीआहे. यामध्ये (Sharad Pawar) शरद पवार यांच्या चिन्हाबाबत संभ्रम कायम राहिलेला दिसला. तुतारी (ट्रम्पेट) या निवडणूक चिन्हामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला जवळपास 9 जागांवर फटका बसला आहे.

आकडेवारी काय सांगते?

विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस असं होतं. याच निवडणुकीत अनेक जागांवर तुतारी (ट्रम्पेट) असे चिन्ह असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तुतारी या नावामुळे अनेक जागांवर शरद पवार यांच्या पक्षाला फटका बसू शकतो, असा अंदाज व्यक्तक केला जात होता. त्याची प्रचीती आता आली आहे. शरद पवार यांच्या पक्षाला या निवडणुकीत एकूण नऊ जागांवर फटका बसला आहे. तुतारीला मिळणारी मतं जर शरद पवार यांच्या पक्षाला मिळाली असती तर या नऊ जागांवर राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे उमेदवार विजयी झाले असते, असं बोललं जात आहे.

शरद पवारांचं टेन्शन वाढलं; निवडणूक चिन्हात पिपाणी राहणारच!  

जिंतूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव, पारनेर, केज, परंडा या जागांवर शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा जेवढ्या मतांनी पराभव झाला आहे, त्यापेक्षा अधिक मतं तुतारी हे निवडणूक चिन्ह असलेल्या उमेदवारा मिळाली आहेत. जालना जिल्ह्यात शरद पवार यांच्या पक्षाचे विजय भांबळे यांचा पराभव झाला. या मतदारसंघात त्यांचा 4516 मते कमी पडली. तर तुतारी म्हणजेच ट्रम्पेटला 7430 मतं मिळाली. घनसावंगीमध्ये राजेश टोपे यांचा 2309 मतांनी पराभव झाला. येथे ट्रम्पेट या चिन्हाला 4830 मते मिळाली. शहापूर येथे शरद पवार यांच्या पक्षाचे पांडुरंग बरोरा यांचा 1672 मतांनी पराभव झाला. येथे ट्रम्पेटला 3892 मते मिळाली. बेलापूरमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे संदीप नाईख यांचा अवघ्या 377 मतांनी पराभव झाला. तर येथे ट्रम्पेटला 2860 मते मिळाली. अणुशक्तीनगर येथे फहाद अहमद यांचा 3378 मतांनी पराभव झाला. तर येथे तुतारीला एकूण 4075 मते मिळाली.

अन्य मतदारसंघांत नेमकं काय घडलं?

आंबेगाव या जागेवर शरद पवार यांच्या पक्षाचे देवदत्त निकम यांचा 1523 मतांनी पराभव झाला. येथे तुतारी म्हणजेच ट्रम्पेट या निवडणूक चिन्ह असलेल्या उमेदवाराल 2965 मते मिळाली. पारनेर या जागेवर शरद पवार यांच्या पक्षाच्या राणी लंके यांचा 1526 मतांनी पराभव झाला. येथे ट्रम्पेटला 3582 मते मिळाली. केज या मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाचे पृथ्वीराज साठे यांचा 2687 मतांनी पराभव झाला. दुसरीकडे याच मतदारसंघात ट्रम्पेटला 3559 मते मिळाली. परंडा या जागेवर राहुल मोटे यांचा 1509 मतांनी पराभव झाला. दुसरीकडे याच मतदारसंघात ट्रम्पेटला 4446 मते मिळाली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीतही सातारा तसंच, इतर लोकसभा मतदारसंघात ट्रम्पेट या निवडणूक चिन्हामुळे शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. त्याचीच प्रचिती आता यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही आली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube