महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार, बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी खास ‘प्लॅन’ तयार…

महाविकास आघाडीने बहुमत मिळाल्यास अनपेक्षित घडामोडी टाळण्यासाठी ‘प्लॅन बी’ तयार केल्याची माहिती समोर आली आहे.

  • Written By: Published:
Vidhansabha Election Result

Vidhansabha Election Result : राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघा (Vidhansabha Election) मतमोजणीला सुरुवात झाली. या निकालांवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. सत्ता स्थापनेच्या शर्यतीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुती (Mahayuti) या दोन्ही आघाड्यांत मोठी चुरस आहे. महाविकास आघाडीने बहुमत मिळाल्यास अनपेक्षित घडामोडी टाळण्यासाठी ‘प्लॅन बी’ तयार केल्याची माहिती समोर आली आहे. दगाफटका टाळण्यासाठी देखील मविआने मोठे पाऊल उचलले.

Result Update : मराठवाड्यात कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?; एका क्लिकवर मिळवा अपडेट 

मविआला बहुमत मिळाल्यास त्यांच्या सर्व उमेदवार मुंबईत आणून सत्ता स्थापनेसाठी दावा करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या राजकीय अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र, जर मविआला आवश्यक बहुमत न मिळाल्यास दुसरा पर्याय तयार करण्यात आला आहे. या परिस्थितीत विजयी उमेदवारांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची रणनीती ठरविण्यात आली आहे.

Maharashtra Assembly Election : मोठी बातमी! अजित पवारांचा कमबॅक, पहिल्या फेरीत आघाडीवर 

मविआने त्यांच्या उमेदवारांना राजकीय दगाफटका होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली आहे. जर सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत काही अडथळे आले, तर विजयी उमेदवारांना कर्नाटकात हलवण्याची तयारी सुरू आहे. कर्नाटक राज्य सुरक्षित असल्याचे मविआच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीतील सर्व विजयी उमेदवारांसह मित्रपक्षांच्या विजयी उमेदवारांनाही कर्नाटकातील सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे. यामागचा हेतूही एक आहे. आघाडीच्या उमेदवारांवर इतर गटांकडून दबाव येऊ नये.

तर महायुतीकडूनही त्यांच्या पक्षीय विजयासाठी प्रयत्न सुरू आहेत.  दरम्यान, सायंकाळपर्यंत महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा चेहरा स्पष्ट होईल. कोणाला बहुमत मिळेल, कोणते गट एकत्र येतील? याबाबत राज्यातील जनतेत कमालीची उत्सुकता आहे.

follow us