नवी दिल्ली : न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा अर्डर्न (Jacinda Ardern) यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. राजीनाम्याची घोषणा करताना त्या म्हणाल्या की, त्या फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला राजीनामा देतील. विविध मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार जसिंडा अर्डर्न यांनी सांगितले की मी निवडणूक लढणार नाही पण मला माहित आहे न्यूझीलंडच्या मतदारांना प्रभावित करणारे मुद्दे कोणते आहेत आणि कोणते मुद्दे निवडणूक जिंकून देतील.
जसिंडा अर्डर्न यांनी सांगितले की त्यांना आता विश्वास आहे की, येणारी निवडणूक लेबर पार्टी जिंकेल. त्यांनी सांगितले आहे की पुढची निवडणूक 14 ऑक्टोबरला होईल तोपर्यंत त्या खासदार म्हणून राहतील आणि मला विश्वास आहे की आम्ही पुन्हा निवडणूक जिंकू. अर्डर्न 7 फेब्रुवारीला आपला राजीनामा देणार आहेत.
पंतप्रधान पद अत्यंत महत्वपूर्ण पद आहे, त्यामुळे तुम्हाला माहित असायला पाहिजे कि तुम्ही कधी या पदासाठी योग्य आहात आणि कधी नाही. त्या पुढे म्हणाल्या कि २०२२ च्या शेवटी मी विचार केला की पंतप्रधान पदावर राहण्यासाठी माझ्याकडे काय गोष्टी आहेत ? आणि शेवटी मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. माझ्यासाठी सरकार चालवणे सध्या अवघड आहे. असंही त्या म्हणाल्या.
न्यूझीलंड मध्ये ऑकटोबर महिन्यात निवडणूक होणार आहेत. जसिंडा अर्डर्न (Jacinda Ardern) 7 फेब्रुवारीच्या दिवशी पंतप्रधानपद आणि लेबर पार्टीचे अध्यक्षपॅड सोडतील. याच महिन्यात 22 जानेवारी रोजी त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष कोण होईल याचा निर्णय घेतला जाणार आहे. उपपंतप्रधान ग्रांट रॉबर्टसन यांनी मात्र स्वतः अध्यक्षपदाच्या शर्यतीमधून बाहेर असल्याचं घोषित केलं आहे.
जसिंडा अर्डर्न यांचा जन्म 26 जुलै 1980 रोजी न्यूझीलंड मधील हॅमिल्टन येथे झाला. त्याचे वडील रॉस आर्डर्न पोलिस अधिकारी आणि आई लॉरेल कुक होत्या. जेसिंडा यांना सुरुवातीपासून राजकारणात रस होता. म्हणूनच त्यांनी 2001 मध्ये वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी न्यूझीलंडच्या लेबर पार्टीमध्ये प्रवेश केला.
तत्कालीन पंतप्रधान हेलन क्लार्क यांच्यासाठी रिसर्चर म्हणून काम पहिले. 2017 मध्ये वयाच्या 37 व्या वर्षी त्या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान झाल्या. तेव्हापासून अनेक कामामुळे आणि अडचणीच्या काळात चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे त्या खूप लोकप्रिय झाल्या होत्या.