Japan News : तांदळावर थेट राजीनामाच दिला. बिहारपासून पश्चिम बंगालपर्यंत देशात अनेक ठिकाणी तांदळाचा खप खूप जास्त आहे. देशात अनेक राज्यांत तांदळाचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. भारताप्रमाणेच जपानमध्येही तांदळाला मोठी मागणी असते. तांदळाला या देशात जास्त महत्व आहे इतकं की कृषिमंत्र्यांनी तांदळाचे उत्पादन आणि किंमतीच्या बाबतीत बोलताना गडबड केली तर त्यांना थेट राजीनामाच द्यावा लागला. आता ही गोष्ट तुम्हाला चकीत करेल. कदाचित तुमचा विश्वासही बसणार नाही. पण हे खरं आहे.
खरंतर जपानमध्ये तांदळाचा खप जास्त आहे. परंतु सध्या येथे तांदळाच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांत सरकार विरोधात असंतोष वाढला आहे. दुसरीकडे तांदळाचा पुरवठाही कमी झाला आहे. यातच कृषिमंत्र्यांच्या वक्तव्याने आगीत तेल ओतण्याचं काम केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर लोकांचा संताप आणखी वाढला आणि मंत्र्यांना थेट राजीनामा द्यावा लागला.
जपानमध्ये सध्या तांदळाचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे सरकारकडून साठा केलेला तांदूळ वेगाने वितरीत करण्याच्या उद्देशाने कृषिमंत्री ताकू ईटो बोलत होते. याच दरम्यान मंत्री ईटो म्हणाले, ‘मी कधीच तांदूळ विकत घेतले नाहीत. खरं सांगायचं झालं तर माझे समर्थक मला भरपूर तांदूळ देतात. माझ्या घरातील कोठारात इतके तांदूळ आहेत की मी ते विकू देखील शकतो.’ त्यांचं हेच वाक्य लोकांना चांगलंच झोंबलं.
लोकांची अन्न-अन्न दशा पण सरकार अन् लष्कर मात्र… युनोच्या रिपोर्टमध्ये पाकमधील धक्कादायक वास्तव समोर
मंत्री ईटो यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी दूर राहण्याचा प्रयत्न केला. इशिबा म्हणाले, मंत्री ईटो यांचं वक्तव्य तांदूळ उत्पादन करणारे शेतकरी आणि ग्राहक या दोघांसाठी आक्रमक होतं. आता कृषिमंत्र्यांनी प्रामाणिकपणे माफी मागितली पाहिजे आणि तांदळाच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. दरम्यान, कृषिमंत्री ईटो यांनी त्यांच्या या वक्तव्यावर जाहीर माफी मागितली आहे. तसेच आज आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान कार्यालयाला पाठवला आहे. यानंतर ईटो म्हणाले, देशातील जनता तांदळाच्या वाढत्या महागाईने हैराण झालेली असताना मी अत्यंच चुकीचं वक्तव्य केलं. पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी माझा राजीनामा स्वीकारला आहे.
जपान सरकारच्या कृषी मंत्रालयानुसार तांदळाच्या किंमती वाढल्या आहेत. देशात जवळपा एक हजार सुपर मार्केटमध्ये पाच किलो तांदळाच्या बॅगची सरासरी किंमत 4,268 येन (29.5 डॉलर) होती. मागील आठवड्याच्या तुलनेत तांदळाच्या किंमतीत 54 येन वाढ झाली आहे. तांदळाच्या वाढत्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
भारत पाकिस्तानच्या वादात बांग्लादेशची चांदी; एलन मस्कच्या कंपनीशी मोठी डील, काय घडलं?