Download App

Javad Zarif : ‘मला लाज वाटते…’, इराणच्या उपराष्ट्रपतींचा राजीनामा, ‘हे’ आहे कारण

Javad Zarif : इस्रायलसोबत (Israel) सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये (Iran) एक मोठी राजकीय घटना घडली आहे. या घटनेमुळे

  • Written By: Last Updated:

Javad Zarif : इस्रायलसोबत (Israel) सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये (Iran) एक मोठी राजकीय घटना घडली आहे. या घटनेमुळे इराणमध्ये अनेक चर्चांना उधाण आले आहे. इस्रायलसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे उपराष्ट्रपती जावद झरीफ (Javad Zarif ) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी या निर्णयामागे अनेक करणे असल्याचे सांगतिले आहे.

नवीन मंत्रिमंडळ सदस्यांच्या नियुक्तीमुळे ते खूश नसल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे. जावेद झरीफ यांनी 2015 च्या ऐतिहासिक आण्विक करारावर जगातील बलाढ्य देशांशी बोलणी केली होती.

झरीफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी गेल्या आठवड्यात धोरणात्मक घडामोडींसाठी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसापूर्वीच झालेल्या निवडणुकीत इराणमध्ये सुधारणावादी अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी बाजी मारली होती. यानंतर पेजेश्कियान उपराष्ट्रपतीपदाची जबाबदारी झरीफ यांच्याकडे दिली होती.

मात्र आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी यावेळी म्हटले आहे की, मला आता लाज वाटत आहे की मी उमेदवार निवडण्यासाठी जबाबदार असलेल्या समितीच्या मताची अंमलबजावणी करू शकलो नाही आणि मी जनतेला दिलेल्या वचनाप्रमाणे या मंत्रिमंडळात महिला, तरुण आणि इतर गटांचा समावेश करू शकलो नाही त्यामुळे मी आपल्या पदाचा राजीनामा दिला. असं ते म्हणाले.

विधानसभेत भाजप ‘इतक्या’ जागांवर निवडणूक लढवणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

उपराष्ट्रपतीपदी नियुक्तीनंतर माझ्यावर देखील दबाब होता कारण माझ्या मुलांकडे अमेरिकन नागरिकत्व आहे. मात्र माझा हा मेसेज प्रिय डॉ. पेझेश्कियान यांच्याबद्दल विरोध करण्याचा नाही. धोरणात्मक घडामोडींसाठी उपाध्यक्ष म्हणून मला माझ्या उपयुक्ततेबद्दल शंका आहे हे सूचित करण्यासाठी आहे. त्यामुळे आता मी पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रात जाणार आहे आणि देशाच्या कमी लक्ष देणार आहे असं देखील यावेळी झरीफ म्हणाले.

follow us