धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट, पाकिस्तानी व्यक्ती जाळ्यात; इराणशीही संबंध

धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट, पाकिस्तानी व्यक्ती जाळ्यात; इराणशीही संबंध

Pakistani National Arrested : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यासह जगातील अन्य महत्वाच्या नेत्यांची हत्या करण्याच्या मोठ्या षडयंत्राचा पर्दाफाश झाला आहे. न्यूयॉर्क शहरात एका पाकिस्तानी नागरिकाला पकडण्यात आले आहे. हा नागरिक अमेरिकी नेत्यांची हत्या करण्यासाठी आला होता अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. या व्यक्तीचे इराण सरकारशीही संबंध आहेत. न्यायालयीन कागदपत्रांनुसार न्याय विभागाने या व्यक्तीवर राजकीय हत्या करण्यासाठी कट रचणे आणि इराण सरकारशी संबंधांचे आरोप ठेवले आहेत.

सीएनएनच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानी व्यक्तीला अटक केल्यानंतर लगेचच डोनाल्ड ट्रम्प आणि अन्य अमेरिकी नेते, अधिाकाऱ्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तक्रारीत मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव नाही. परंतु, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीच्या निशाण्यावर अन्य नेत्यांसह डोनाल्ड ट्रम्प देखील होते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी एका निवडणूक रॅलीत भाषण करत असताना ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला होता. यात ट्रम्प थोडक्यात बचावले होते. त्यांच्या कानाला गोळी लागली होती.

ठरलं! डोनाल्ड ट्रम्पच देणार जो बायडेनला टक्कर, तिसऱ्यांदा उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

या घटनेनंतर त्यांची सुरक्षा व्यवस्था अधिक काटेकोर करण्यात आली होती. आता पुन्हा ट्रम्प यांच्यासह अन्य नेत्यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्याने अमेरिकेत खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील ब्रुकलिन येथील एका तक्रारीनुसार पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी व्यक्तीचे नाव असिफ मर्चंट आहे. त्याला असिफ रजा मर्चंट या नावानेही ओळखले जाते. या व्यक्तीवर पैसे घेऊन अमेरिकी नेते किंवा अधिकाऱ्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. एफबीआयने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मोठा कट सफल होण्याआधीच या व्यक्तीला पकडण्यात आले. या व्यक्तीला सध्या न्यूयॉर्कमध्ये अटकेत ठेवण्यात आले आहे.

असिफ रजाने हत्या करण्यासाठी ज्या लोकांना नियुक्त केले होते ते एफबीआयचे एजंट होते. एफबीआय न्यूयॉर्क फील्ड ऑफिस कार्यवाहक सहायक निदेशक क्रिस्टी कार्टिस यांनी सांगितले की ज्या लोकांना असिफ रजाने हत्या करण्यासाठी नियुक्त केले होते ते सगळे एफबीआयचे गुप्त एजंट होते. ही सुदैवाची गोष्ट म्हणावी लागेल. यामुळे मोठ्या कटाचा उलगडा आम्हाला करता आला.

डोनाल्ड ट्रम्पवर कुणी केला गोळीबार? पोलिसांनी ‘तो’ हल्लेखोर शोधून काढलाच

दरम्यान, अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची तयारी सध्या सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प उमेदवार आहेत. तर विद्यमान  राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी माघार घेतली आहे. त्यांच्या जागी कमला हॅरिस उमेदवार असण्याची शक्यता आहे. या निवडणुका जवळ आलेल्या असतानाच अमेरिकी नेत्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube