Karachi Football Team : पाकिस्तानमध्ये धक्कादायक घटना; महामार्गावर फुटबॉल संघाला लुटले

Karachi Football Team : पाकिस्तानमधून एक धक्कादाय घटना समोर आली आहे. पीटीआयने दिलेल्या एका वृत्तानुसार, एका मोठ्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी

Karachi Football Team

Karachi Football Team

Karachi Football Team : पाकिस्तानमधून एक धक्कादाय घटना समोर आली आहे. पीटीआयने दिलेल्या एका वृत्तानुसार, एका मोठ्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी निघालेल्या काराचीतील एका फुटबॉल संघाला बलुचिस्तानमधील एका महामार्गावर सशस्त्र दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून लुटले. माहितीनुसार, दरोडेखोरांनी सर्व खेळाडूंकडून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेतले. तसेच काही जणांना मारहाण देखील करण्यात आल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.

माहितीनुसार, कराचीचा (Karachi) संघ क्वेट्टाला जात होता. बलुचिस्तान (Balochistan) महामार्गावर, मस्तुंग आणि सरियाब दरम्यान,सशस्त्र असलेल्या एका गटाने 20 सदस्यांच्या फुटबॉल संघाला घेऊन जाणाऱ्या बसला घेराव घातला. कराची वेस्ट संघ मुख्यमंत्री सुवर्ण चषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात होता मात्र त्यापूर्वीच ते लुटमारीचे बळी ठरले. त्यांच्याकडून फोन आणि इतर वस्तू काढून घेण्यात आल्या. या घटनेबाबत संघाचे व्यवस्थापक झुल्फिकार अली भुट्टोने माहिती दिली.

ते म्हणाले की, सशस्त्र लोकांनी सर्वांना बसमधून खाली उतरण्यास भाग पाडले. त्यांनी प्रत्येकाकडून मोबाईल फोन, रोख रक्कम आणि इतर वस्तू हिसकावून घेतल्या. तसेच, त्यांनी इतर काही प्रवाशांना मारहाणही केली. या घटनेची माहिती त्वरित बलुचिस्तानच्या क्रीडा मंत्र्यांना देण्यात आली. यानंतर क्रीडा मंत्रीने मंत्र्यांनी त्यांच्या दैनंदिन भत्त्याची (Daily Allowance) व्यवस्था केली.

तर दुसरीकडे सिंध फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आझम खान यांनी फुटबॉल संघालाच जबाबदार धरले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्या भागात प्रवासासाठी बस किंवा ट्रेनचा वापर न करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या, असा दावा त्यांनी केला आणि अप्रत्यक्षपणे या घटनेसाठी कराची फुटबॉल संघालाच जबाबदार धरले. ते म्हणाले, आम्ही या स्पर्धेसाठी सिंध संघाला पाठवले नव्हते.

सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास न करण्याबाबत आम्ही कराचीच्या संघासह सर्व क्लब्सना आधीच इशारा दिला होता. तसेच, बस किंवा ट्रेनने क्वेट्टाला न जाण्याचा सल्लाही आम्ही सर्वांना दिला होता. असे असूनही, कराची वेस्टचा संघ तिथे गेला आणि त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले. अखेरीस, ज्या गोष्टीची आम्हाला भीती वाटत होती, तीच घडली.

Exit mobile version