कलम 370- पाकिस्तान अनेक देशांत 5 ऑगस्टपासून भारतविरोधी निदर्शने करणार

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून जगभरात भारताची प्रतिमा मलिन करण्याच्या तयारीत पाकिस्तान आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर एक टूल किट जारी केली आहे. यामध्ये विविध देशांतील त्यांच्या दूतावासांना आणि उच्चायुक्तांना 5 ऑगस्ट रोजी भारताविरोधात आंदोलन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (kashmir article 370 pakistan foreign ministry toolkit vs india) पाकिस्तान 5 ऑगस्ट हा योम-ए-इस्तेशल म्हणजेच शोषण […]

WhatsApp Image 2023 07 29 At 3.23.16 PM

WhatsApp Image 2023 07 29 At 3.23.16 PM

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून जगभरात भारताची प्रतिमा मलिन करण्याच्या तयारीत पाकिस्तान आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर एक टूल किट जारी केली आहे. यामध्ये विविध देशांतील त्यांच्या दूतावासांना आणि उच्चायुक्तांना 5 ऑगस्ट रोजी भारताविरोधात आंदोलन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (kashmir article 370 pakistan foreign ministry toolkit vs india)

पाकिस्तान 5 ऑगस्ट हा योम-ए-इस्तेशल म्हणजेच शोषण दिन म्हणून साजरा करेल. खरं तर, 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने कायदा आणून जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम 370 रद्द केले.

पाकिस्तानने तुर्कीमध्ये काश्मीरवर चर्चासत्र आयोजित केले होते

कलम 370 हटवून चार वर्षे पूर्ण होण्याआधीच पाकिस्तानने आपला अपप्रचार सुरू केला आहे. त्याच महिन्यात पाकिस्तानने तुर्कीमधील आपल्या दूतावासात काश्मीरवर चर्चासत्र आयोजित केले होते. त्याला ‘जम्मू काश्मीर विवाद, समाधानाचा शोध’ असे नाव देण्यात आले.

पाकिस्तानवर उपासमारीची वेळ, ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 99व्या क्रमांकावर घसरण

वास्तविक, तुर्कस्तान पाकिस्तानला पाठिंबा देतो आणि काश्मीर प्रश्नावर भारताला विरोध करतो. अशा स्थितीत पाकिस्तानला तेथे अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे सोपे जाते. पाकिस्तानने पीओकेमध्येही असाच एक सेमिनार आयोजित केला होता. त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमध्ये चित्रकला स्पर्धाही आयोजित केली जाणार आहे.

कलम 370 हटवल्यानंतर भारत-पाक संबंध आणखी बिघडले

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान होते. जोपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 पुनर्संचयित होत नाही, तोपर्यंत भारतासोबत कोणतीही चर्चा होणार नाही, असे ते म्हणाले होते.

Exit mobile version