Kenya Bus Accident : आफ्रिकेतील देश केनियातून एक धक्कादायक बातमी (Kenya Bus Accident) समोर आली आहे. केनियातील दक्षिण पश्चिम भागात अंत्यसंस्कारानंतर माघारी निघालेल्या एका बसचा भीषण अपघात झाला. बस एका खोल दरीत कोसळली. या अपघातात बसमधील किमान 21 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार बस काकमेगा येथून किसुमु या शहराकडे जात होती.
न्यान्जा प्रांतातील स्थानिक वाहतूक अधिकारी पीटर मायना यांनी सांगितले की बस अतिशय वेगात होती. येथील गोल चक्करजवळ पोहोचल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले त्यामुळे भरधाव वेगातील बस दरीत जाऊन कोसळली. या अपघातात 21 प्रवाशांचा मृत्यू झाला. मयतांत 10 महिला 10 पुरुष आणि एक दहा वर्षीय मुलीचा समावेश आहे.
मोठी बातमी! केनियामध्ये करविरोधी आंदोलनात 39 जण ठार, भारतीय दुतावासाच्या महत्वाच्या सुचना
एक स्थानिक पोलीस अधिकारी पीटर मॅना यांच्यानुसार भरधाव वेगातील बसचे नियंत्रण चालकाकडून सुटल्याने हा अपघात झाला. केनिया आणि पूर्व आफ्रिकेतील देशांत रस्ते अपघात मोठ्या संख्येने होतात. या भागात रस्ते अतिशय खराब आहेत. रस्त्यात मोठे खड्डे आहेत. त्यामुळे येथे कायम अपघात होत राहतात. भरधाव वेगातील वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. याआधी गुरुवारीही आणखी एक अपघात नाकुरू काउंटीतील नैवाशा शहरात झाला. येथे एका बस अपघातात नऊ लोकांचा मृत्यू झाला.