Kerala student murdered in Britain : ब्रिटनमधील लंडनमध्ये शुक्रवारी एका भारतीय विद्यार्थ्याची त्याच्या फ्लॅटमेटने हत्या केली. अरविंद ससीकुमार (37) याच्या छातीत 25 वर्षीय सलमान सलीमने चाकूने वार केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीला अटक करण्यात आली आहे. मृत आणि आरोपी दोघेही केरळचे रहिवासी होते. या घटनेसह ब्रिटनमध्ये गेल्या चार दिवसांत तीन भारतीयांची हत्या करण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृतक आणि आरोपी कॅम्बरवेलच्या साउथम्प्टन वे भागात एकाच घरात राहत होते. फ्लॅटमध्ये त्याच्यासोबत राहणाऱ्या दोघांनी पोलिसांना सांगितले की, दोघांमध्ये भांडण झाले. ही घटना शुक्रवारी रात्री एक वाजल्यानंतर घडली. दुपारी दीड वाजता पोलिसांना याची माहिती मिळाली. आरोपी सलमानशिवाय पोलिसांनी घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या दोन मल्याळी रूममेट्सनाही ताब्यात घेतले आहे.
अरविंद शशीकुमार यांचा जागीच मृत्यू झाल्याचे महानगर पोलिसांनी सांगितले. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार आरोपीने त्याच्या छातीवर वार केले होते. पोलिसांनी आरोपी सलमान सलीमला शनिवारी क्रॉयडन दंडाधिकारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला कोठडीत पाठवले आहे. त्याला 20 जून रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
व्वा… कमाई असावी तर अशी! विराट कोहलीची संपत्ती 1000 कोटींच्या पार, असा कमवतो बक्कळ पैसा
शशीकुमार गेल्या 10 वर्षांपासून स्टुडंट व्हिसावर यूकेमध्ये राहत होता. त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. विशेष गुन्हे शाखेच्या मदतीने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. डिटेक्टिव्ह चीफ सुपरिटेंडेंट सेब अदजेई-अडोह म्हणाले, ही घटना अत्यंत दुःखद आहे. या हत्येला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करू.
काही दिवसांपूर्वी हैदराबादमधील एका 27 वर्षीय तरुणीची लंडनमधील राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. तेजस्विनी रेड्डी असे या तरुणीचे नाव असून ती लंडनमधील वेम्बली येथे तिच्या मैत्रिणींसोबत राहत होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. तेजस्विनी गेल्या वर्षी मार्चमध्ये मास्टर्स करण्यासाठी लंडनला गेली होती.
बृजभूषण शरणसिंहांच्या विरोधातील आंदोलनाला भाजप नेत्यांची हवा? साक्षी मलिकचा मोठा गौप्यस्फोट
यापूर्वी नॉटिंगहॅमशायरमध्येही तीन जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये भारतीय युवा क्रिकेटपटू आणि हॉकीपटू ओ’माल्ले कुमार यांचाही मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी 31 वर्षीय आरोपीला अटक केली होती. या घटनेत 3 जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.