Iceland News : जगातील अनेक लोकांचा मृत्यू डास चावल्याने (Mosquito) होणाऱ्या आजारांमुळे होतो. काही हंगाम असे असतात ज्यावेळी डासांची फौज जगणे कठीण करून टाकते. भारतात तर अशी एकही जागा नाही जिथे डास नाहीत. पण या जगाच्या पाठीवर (Iceland News) असाही एक देश आहे जिथे डास नावालाही सापडत नाही. शास्त्रज्ञांकडून या अजब गोष्टी मागील सत्य शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
डास तुमचं रक्त पितात. कानाजवळ भणभण करतात. काही वेळेस तर डास इतके त्रास देतात की रात्री झोपणे सुद्धा कठीण होऊन बसते. डासांपासून अनेक आजारांचा फैलाव होतो. डासांच्या चावण्याने जगभरात दरवर्षी किमान दहा लाख लोकांचा मृत्यू होतो असा अंदाज आहे. पण ज्या देशात एकही डास नाही तिथे नेमकी काय परिस्थिती आहे? या देशात डास का नाहीत? या प्रश्नांची उत्तरे मिळवू या..
जगातील कोणत्याही देशात जा तिथे डास असतातच. काही हवामानात तिथे डास दिसत नसतील पण अनुकूल वातावरण तयार होताच डास पुन्हा येतातच. त्यांच्या चावण्याने अनेक आजारांचा फैलाव होतो. जगात कुणालाच या डासांपासून सुटका नाही. पण असा कोणता देश आहे जेथे डास आजिबात नाहीत. याचा विचार केलाय का.. कदाचित हा देश फ्रान्स असेल का किंवा अमेरिका, स्वित्झर्लंड, आयर्लंड असेल का.. नाही यातील कुणीही नाही. या डासमुक्त देशाचे नाव आहे आइसलँड.
आइसलँड जगातील एकमेव देश आहे जिथे एकही डास नाही. पण यामागचे कारण कुणालाच माहिती नाही. या देशातील वातावरण अंटार्टिका इतकं थंड नाही, आइसलँड मध्ये तलाव आणि ओढ्यांचीही कमतरता नाही. याच ठिकाणी डासांची पैदास अत्यंत वेगाने होते. आइसलँड शेजारील नॉर्वे, डेन्मार्क, स्कॉटलंड या देशांतही डास आहेत मग आइसलँड मधेच डास कसे नाहीत. हे एक रहस्यच म्हणावे लागेल.
‘झणझणीत मिसळ’, ‘छोले भटुरे’ अन् ‘स्वादिष्ट पराठा’, बेस्ट ब्रेकफास्ट यादीत 3 भारतीय डिश
या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी शास्त्रद्यांनी अनेक संशोधने केली. समुद्री जलवायु या डासांना दूर ठेवते असा अभ्यास शास्त्रद्यांनी मांडला आहे. जगात 30 मिलियन वर्षांपासून डास आहेत. जगात डासांच्या साडेतीन हजारांपेक्षा जास्त प्रजाती आढळतात.
शास्त्रज्ञांच्या मते डासांना ओले, आर्द्रता असलेले वातावरण जास्त अनुकूल असते. परंतु, थंड वातावरणातही डास तग धरू शकतात. आइसलँडमधील पाणी आणि मातीची रासायनिक संरचना डासांच्या उत्पत्तीसाठी उपयुक्त नाही. पण असे का तर हे एक गूढ आहे. याचं उत्तर काय असेल याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जगभरात ग्लोबल वॉर्मिंगची (Global Warming) समस्या निर्माण झाली आहे. यामुळे अनेक नैसर्गिक संकटे नजीकच्या काळात निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. या ग्लोबल वॉर्मिंगमुळे कदाचित आइसलँडमध्येही डासांची उत्पत्ती होऊ शकते. सध्या आइसलँडच्या आइसलँडिक इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल हिस्ट्री म्युझियनमध्ये डासाचे अवशेष सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.
तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण दररोज 30 टक्के प्रौढ डास मरत असतात. पण आपलं अस्तित्व संकटात येऊ नये यासाठी डासांच्या मादी बेसुमार अंडी देत असतात. त्यामुळे मयत होणाऱ्या डासांच्या संख्येची लवकरच भरपाई होते. नर डास साधारण फक्त सहा ते सात दिवस जगू शकतो. मलेरिया, लिम्फेटिक फाइलेरिया, जीका, वेस्ट नाइल व्हायरस, चिकनगु्णिया, पिवळा ताप आणि डेंग्यू यांसारखे घातक आजार डासांमुळे पसरतात.
Food Allergy : अन्नपदार्थाची ॲलर्जी कशी ओळखायची? लक्षणे कोणती? तज्ञांनी दिली A टून Z माहिती
तुमच्यासाठी आणखी एक खास माहिती देऊ इच्छितो. तुम्हाला ही गोष्ट कदाचित माहिती नसेल जगाच्या पाठीवर साडेतीन हजारांपेक्षा जास्त डासांच्या प्रजाती आहेत. परंतु, यातील फक्त 6 टक्के मादी डासच माणसांना चावतात आणि यातील अर्ध्यामुळेच माणसांत आजारांचा फैलाव होतो.