आइसलँड-रशियामध्ये शीतयुद्ध, आइसलँडने घेतला मॉस्कोमधील दूतावास बंद करण्याचा निर्णय

आइसलँड-रशियामध्ये शीतयुद्ध, आइसलँडने घेतला मॉस्कोमधील दूतावास बंद करण्याचा निर्णय

Iceland Vs Russia : रशियाचे (Russia) आपल्या शेजारीला राष्ट्रांशी असलेले संबंध दिवसेंदिसव तणावाचे होत आहेत. गेल्या वर्षी रशिया आणि युक्रेन (ukraine) यांच्यात मोठे युध्द झाले होते. दरम्यान, आता आइसलँड (Iceland) आणि रशियामधील संबंध देखील सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत. अलीकडेच रिक्जेविकने मॉस्कोमधील आपला दूतावास(Embassy) बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच रशियाला रिक्जेविकमधील आपलं बस्तान उचलायला सांगितलं. त्यामुळं रशिया संतप्त झाला आहे. त्यांनी आइसलँडला आपल्यामधील संबंध बिघडवण्याला जबाबदार धरलं आहे. (Iceland will close its embassy in Moscow, Russia furious over the decision)

रशियाने शनिवारी सांगितले की, जेव्हा आइसलँड मॉस्कोमधील आपल्या दूतावासाचे कामकाज स्थगित करेल, त्यावेळी आमच्याकडून आइसलँडला रशियन विरोधी कृतींचं निश्चित उत्तर दिले जाईल. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, आइसलँड दोन्ही देशांमधील संबंध बिघडवत आहे. मंत्रालयाने पुढे सांगितले की, आइसलँडच्या या निर्णयामुळे आम्ही येणाऱ्या काळात सतर्क राहू. आइसलँडसोबत भविष्यात कुठलाही व्यवहार करतांना त्यांनी केलेल्या रशियन विरोधी कृती ध्यानात घेऊ.

कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर सुप्रिया सुळे कोणाला रिपोर्टिंग करणार? थेट दिले उत्तर

आइसलँडने शुक्रवारी सांगितले की ते 1 ऑगस्टपासून मॉस्कोमधील आपल्या दूतावासाचे काम थांबवले जाईल. त्यांनी रशियाला रेकजाविकमधील आपल्या ऑपरेशन मर्यादित करण्यास सांगितले आहे. परराष्ट्र मंत्री थोरिस गिल्फडोटीर म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत आइसलँडच्या छोट्या परराष्ट्र सेवेसाठी रशियामध्ये दूतावास चालवणे सोपे नाही, त्यामुळं मास्कोमधील दूतवास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, दूतवास बंद करण्याचे संकत मिळाल्यानंतर दूतवासातील कर्मचारी शुक्रवारी मॉस्कोमधील दूतावासाच्या बाजूला टांगलेला आइसलँडचा ध्वज खाली घेताना दिसले.आइसलँडच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, या निर्णयामुळे राजनैतिक संबंध तोडले गेले नाहीत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube