जगभरात आपण पत्नी-पत्नीच्या प्रेमाच्या कहाण्या ऐकल्या किंवा वाचल्या असतील. तर, अनेकदा पती-पत्नीमधील वाद झालेलेदेखील ऐकले असतील. यातील काही घटना या अतिशय भयानक अशा असतात ज्या ऐकतानाही अंगावर अक्षरक्षः शहारे येतात. अशाच एका निर्दयी पत्नीची स्टोरी समोर आली आहे. यात या महिलेने पहिले तिच्या पतीची हत्या केली आणि त्यानंतर तिने गुगलवर लग्जरी जेल शोधले. न्यायालयीन सुनावणीदरम्यान तपास यंत्रणांनी हा खुलासा केला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. (Wife Search Luxury Prisons After Husband Murder)
कोरी रिचिन असे पतीची हत्या करणाऱ्या महिलेचे नाव असून ती 33 वर्षांची आहे. पतीच्या हत्येनंतर आपल्या जेलची हवा खावी लागणार याची कल्पना रिचिनला होती. त्यासाठीच ती आगावू व्यवस्था करत होती. हत्येनंतर आपल्याला कोणत्या जेलमध्ये आरामात आयुष्य जगता येईल यासाठी तिने गुगलवर ‘श्रीमंतांसाठी लक्झरी जेल’ शोधले. इतकेच नाही तर, पतीच्या निधनानंतर तिने आयुर्विमा कंपन्यांकडून टर्म प्लॅनबाबत अनेकवेळा शोध घेतला. धक्कादायक बाब म्हणजे पतीच्या हत्येपूर्वी तिने ही सर्व माहिती सर्च केली होती.
वडिलांनंतर आता Gautami Patil ची आईही कॅमेऱ्या समोर; मिठी मारत गौतमीने…
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, हे सर्व प्रकरण अमेरिकेचे असून, कोरी रिचिन नावाच्या महिलेने मार्च 2022 मध्ये फेंटॅनाइलचा ओव्हरडोज देऊन पती एरिक रिचिनची हत्या केली होती. यानंतर पोलीस तपासात तिच्या गुगल सर्च हिस्ट्री तपासली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. ज्या पाहून पोलिसही चक्रावून गेले. हत्येनंतर आपल्याला तुरूंगाची हवा खावी लागणार याची पूर्ण कल्पना रिचिनला होती आणि त्यासाठीच तिने अमेरिकेत श्रीमंतांसाठी आलिशान जेल आहे की नाही याचा शोध घेतला. एवढेच नव्हे तर, पतीच्या मृत्यूनंतर दावेदारांना पैसे देण्यासाठी आयुर्विमा कंपन्या किती वेळ घेतात? पोलिस लाय डिटेक्टर टेस्ट करायला लावू शकतात का? याबाबतही शोध घेतला. तसेच मृत्यू प्रमाणपत्रावर मृत्यूचे कारण बदलता येईल का? याचा देखील तिने शोध घेतल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
Biparjoy Cyclone अगोदर भारताला धडकली ‘ही’ 5 मोठी चक्रीवादळं; अनेकांचा घेतला जीव!
पतीच्या स्मरणार्थ लिहिले पुस्तक
दरम्यान, पतीच्या हत्या केल्यानंतर कोरीने तिच्या पतीच्या स्मरणार्थ आर यू विथ मी?असे शिर्षक असलेले एक लहान मुलांचे पुस्तक देखील लिहिले, या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी ती अनेक कार्यक्रमांनाही गेली, जिथे तिला नवऱ्याच्या जाण्याने किती दु:ख झाले हे सांगायचे होते.