वडिलांनंतर आता Gautami Patil ची आईही कॅमेऱ्या समोर; मिठी मारत गौतमीने…
Gautami Patil Mother : आपल्या ठसकेदार ठुमक्यांवर महाराष्ट्रातल्या तरुणांना वेड लावणारी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या काही दिवसांपासून गौतमी पाटील सारखी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. आधी तिच्या नृत्यावर बोट ठेवून अनेकांनी टीका केली. त्यावर गौतमीने माफीही मागितली. त्यानंतर कार्यक्रमात गोंधळामुळे ती चर्चेच होती.तसेच आडनावाच्या मुद्द्यावरुन चर्चेत आली होती. त्यानंतर आता खासगी आयुष्याशी संबंधित बातमी समोर आलीय. ही बातमी म्हणजे गौतमीची आई पहिल्यांदाच कॅमेऱ्या समोर आली आहे. ( After father her Mother on Camera for first time Gautami Patil hugs and said )
‘बूंद से गयी वो हौद से नही आती’; जाहिरातीवरुन अजितदादांचा निशाणा
गौतमीने अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगताना आपल्या आईबद्दल सांगितले आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी तिने आपल्या लहानपणीचा आईसोबतचा एक फोटो शेअर केला होता. मात्र आता गौतमीची आई कशी दिसते?ती काय कारते? याची चाहत्यांना मोठी उत्सुकती होती. त्यात आता गौतमीच्या आईचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच तिची आई कॅमोऱ्यासमोर आली आहे.
एका सोशल मीडिया चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये गौतमी तिच्या आईला मिठी मारताना दिसत आहे. यामध्ये तिचा एक चाहता तिच्यावर ‘उंबराच्या झाडाला दत्ताची सावली, गौतमीला जन्म देणारी धन्य ती माऊली हा शेअर म्हणत गौतमी आणि तिच्या आईचं कौतुक करत आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
वाद शिगेला! बेडूक कितीही फुगला तरी…; बोंडेंची CM शिंदेंवर उघड टीका
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांनी गौतमीच्या वडिलांचा शोध घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी गौतमीच्या वडिलांनी तिला भावनिक साद घालत भेटण्याची विनवणी केली. गौतमीचे वडिल जळगावच्या चोपडा गावात शेती करुन आपला उदरनिर्वाह करतात. रविंद्र नेरपगारे असं त्यांच नाव असून कौटुंबिक वादामुळे ते गौतमीच्या आईपासून विभक्त झाले होते. त्यानंतर आज तब्बल 18 वर्षांनतर त्यांना आपल्या मुलीला भेटण्याचं माध्यमांसमोर बोलून दाखवलं.