फडणवीस नक्की समजून घेतील; शंभुराज देसाईंना पूर्ण विश्वास

फडणवीस नक्की समजून घेतील; शंभुराज देसाईंना पूर्ण विश्वास

Shambhuraj Desai on Devendra Fadnavis : शिवसेना शिंदे गटाकडून वर्तमानपत्रांमध्ये एक जाहिरात (Shivsena Advertisement) दिली होती. या जाहिरातीवरून संपूर्ण दिवसभर राजकारण तापलेलं पाहायला मिळाले. या जाहिरातीतील चूक लक्षात आल्याने मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी माघार घेत दुसरी जाहिरात दिली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचाही फोटो आहे. शिंदे गटाकडून आता या प्रकारावर सारवासारव केली जात आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai)यांच्याकडून त्या जाहिरातीवरुन झालेल्या वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या गोष्टी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)नक्कीच समजून घेतील असंही मंत्री शंभुराज देसाई म्हणाले. आम्हाला युती टिकवायची आहे. त्रयस्त व्यक्तीमुळे आमच्या महायुतीमध्ये कसलाही बेबनाव येणार नाही असेही यावेळी मंत्री देसाई म्हणाले. (shambhuraj-desai-on-devendra-fadnavis-shivsena-advertisement-bjp-shivsena-mahayuti)

Shambhuraj Desai : ‘रोहित पवारांनी डायग्नॉस्टिक सेंटर काढले आहे का’?

मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, आम्ही सर्वजण मंगळवारी अर्धा दिवस देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होतो. कुठही त्यांच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये असं जाणवलं नाही. कारण त्यांनासुद्धा कल्पना आहे की, आम्ही पक्षाकडून अशी कुठलीही जाहिरात दिली नाही. त्यांना या गोष्टी आपण स्वतः सांगितल्या आहेत, मंत्री दीपक केसरकर यांनी देखील सांगितल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे देवेंद्र फडणवीस समजून घेतील.

रेशीमगाठी पुन्हा जुळून येणार! सेना-भाजपमधील वादावर देसाईंचा ‘रामबाण’ उपाय

आम्हाला युती टिकवायची आहे. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे, त्रयस्त व्यक्तीमुळे घडलेल्या बाबींमुळं आमच्या महायुतीमध्ये कसलाही बेबनाव येणार नाही, आम्ही एकमेकांना समजून घेऊ. आमचा एकच उद्देश आहे की, 2024 च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून लोकसभेच्या मागच्या वेळपेक्षा जास्त जागा निवडून आणायच्या, हा एकच उद्देश घेऊन आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुढे चाललो आहे. ते पूर्ण करण्यासाठी एकच ध्येय आणि उद्दिष्ट आमचं असल्याचं यावेळी मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले आहे.

मंगळवारी राज्यातील वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेल्या जाहिरातीवरुन संपूर्ण राज्यभरातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. विरोधकांनी या जाहिरातीवरुन चांगलेच धारेवर धरले. अनेक भाजप नेत्यांनी या जाहिरातीवरुन नाराजी व्यक्त केली, त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. त्यावर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता ही जाहिरात शिवसेनेकडून दिलीच नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube