रेशीमगाठी पुन्हा जुळून येणार! सेना-भाजपमधील वादावर देसाईंचा ‘रामबाण’ उपाय

रेशीमगाठी पुन्हा जुळून येणार! सेना-भाजपमधील वादावर देसाईंचा ‘रामबाण’ उपाय

shambhuraj desai on Shivsena Advertisement : भाजप-शिवसेनेत काल वर्तमानपत्रात छापून आलेल्या जाहिरातीने वाद निर्माण झाला होता. भविष्यात भाजप-शिवसेनेत वाद निर्माण होणार नाहीत यासाठी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांनी रामबाण उपाय शोधला आहे. युतीमध्ये पुन्हा वाद नको म्हणून समन्वय समिती स्थापन करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी या जाहिरातीमुळे भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखावल्याचे सांगितले आहे. यावर शिवसेना नेते शंभूराज देसाई म्हणाले की काल वर्तमानपत्रात जाहिरात छापून आल्यानंतर मी आणि दीपक केसरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. काही गैरसमज निर्माण झालेत ते दूर करु अशी आम्ही भूमिका मांडली आणि त्यांनी देखील समजून घेतलं. आतापर्यंत झालं गेलं बाजूला ठेवून 2024 ला महायुतीचे सरकार पुन्हा आणण्यासाठी एकत्रपणे काम करु. युतीमध्ये पुन्हा वाद नको म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच समन्वय समिती स्थापन करणार आहेत, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

ठाण्यातील 100 लोकांना पोलीस संरक्षण कशासाठी? अजितदादांचा थेट सवाल

शंभूराज देसाई पुंढ म्हणाले की आज वर्तमानपत्रात छापून आलेली जाहिरात शिवसेनेचे अधिकृत जाहिरात आहे. राज्य सरकारचे काम आणि जनमताचा कौल या जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे. काल छापून आलेल्या जाहिरातीचा शिवसेनेशी काही संबंध नाही. त्या जाहिरातीवर आता पडदा टाकला पाहिजे, असे देसाई म्हणाले.

‘बूंद से गयी वो हौद से नही आती’; जाहिरातीवरुन अजितदादांचा निशाणा

भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देताना शंभूराज म्हणाले की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या गोष्टीवर जास्त चर्चा न करता 2024 चे लक्ष डोळ्यासमोर ठेवून काम करुया अशी भूमिका घेतली आहे. त्या भूमिकेच पालन आम्ही करतोय त्याचप्रमाणे खासदार अनिल बोंडे यांनी देखील करावं. एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. त्यांना अनिल बोंडे काही उपमा देत असतील तर त्यांना सांगणं आहे की एकनाथ शिंदे यांच्या कामाची नोंद संपूर्ण देशाने घेतली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube