CM शिंदेंच्या ठाण्यात 100 लोकांना संरक्षण; कोण आहेत ते? अजित पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट

CM शिंदेंच्या ठाण्यात 100 लोकांना संरक्षण; कोण आहेत ते? अजित पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Ajit Pawar On Eknath Shinde : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी शिवसेनेच्या जाहिरातीवरुन जोरदार निशाणा साधला आहे. जाहिरात देणार तो हितचिंतक कोण आहे, असा सवालही यावेळी पवार यांनी केला आहे. त्याचवेळी अजितदादांनी ठाणे (Thane)जिल्ह्यातील 100 लोकांना पोलीस संरक्षण (Police protection)दिलं जात असल्याचा आरोप केला आहे. ठाणे जिल्ह्यातील संरक्षण देणाऱ्या व्यक्ती कोण-कोण आहेत? कोणत्या क्षेत्रातल्या आहेत? याची माहिती मी सातत्यानं मागत आहे, पण माहिती द्यायला तयार नाहीत, असा आरोपही यावेळी अजित पवारांनी केला आहे.

Ahmednagar : “गद्दार म्हणणे म्हणजे लहान पोराने मांडीवर घाण करणे”; राजेंद्र फाळके यांचे स्पष्टीकरण

अजितदादा म्हणाले की, माहितीनुसार ठाणे शहर आणि जिल्ह्यापुरतं अंदाजे 100 लोकांना संरक्षण दिलं जात आहे. असं काय ठाणे जिल्ह्यात घडलंय की, शंभर-शंभर लोकांना संरक्षण दिलं जात आहे. खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी त्यांचं लोकसभेचं, विधिमंडळाचं काम आहे, त्यांच्याबद्दल माझं काही दुमत नाही. त्यांना संरक्षण देणं हे कामच आहे.

‘संजय राऊतांची वाक्ये कानावर पडू देऊ नका’; शंभूराज देसाईंचा रोहित पवारांना सल्ला

संरक्षण देत असताना तुम्ही शंभर-शंभर लोकांना संरक्षण देत असाल आणि त्याचा खर्च शासनावर पडतो, तो करोडोंमध्ये जातो. तर कोणाकोणाला संरक्षण दिलंय, त्यांचे व्यवसाय काय? त्यात काही काही जण तर त्यांचे व्यवसाय इतर वेगळ्या प्रकारचे आहेत, अशा व्यवसाय धारकांना संरक्षण देण्याची काहीच गरज नाही. कारण त्यांनी त्यांचे व्यवसाय बदलावे, त्यांच्या जीवाला धोका असण्याचं काहीच कारण नाही. पण आजपर्यंत माझ्याकडं ती यादी आलेली आहे.

माझ्याकडं ती 100 लोकांची यादी आलेली आहे. त्यात काही लोकप्रतिनिधी आहे, त्याच्यावर माझा आक्षेप नाही आणि सर्वसामान्य माणसाचा जीव काही धोक्यात आला तर त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. त्याबाबत माझा काही आक्षेप नाही मात्र त्या यादीत निम्म्याच्यावर लोकं अशी आहेत की, त्यांना संरक्षणाची गरज नाही. ते फक्त मोठेपणा मिरवण्याकरता त्याचा वापर केला जात आहे.

जनतेच्या पैशाच्या जोरावर यांचा मोठेपणा वाढवण्याचा प्रयत्न का केला जात आहे, असा सवाल यावेळी अजित पवारांनी उपस्थित केला आहे. त्याचवेळी पवारांनी अशीही मागणी केली केली की, ठाणे जिल्ह्यातील कोणकोणत्या लोकांना संरक्षण दिलं आहे, याची यादी प्रसिद्ध करावी, त्यांचा हुद्दा काय याबाबत माहिती प्रसिद्ध करावी, अशीही मागणी अजित पवार यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube