Download App

Libya Flood : धक्कादायक! पुरातील मृत्यूंची संख्या 6 हजारांवर

Libya Flood : लीबियात सोमवारी आलेल्या विनाशकारी महापुरात (Libya Flood) अनेक शहरे उद्धवस्त झाली. तसेच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. या पुरात आतापर्यंत तब्बल सहा हजारांपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. लीबियातील संयुक्त सरकारचे आरोग्य सहाय्यक सचिव सादेद्दीन अब्दुल वाकिल यांनी याबाबत माहिती दिली. भूमध्य समुद्रात आलेल्या डॅनियल वादळाने लिबियामध्ये हाहाकार माजविला आहे. वादळामुळे झालेल्या पावसामुळे लिबियामधील दोन धरणे फुटली आहेत. या धरणांचे पाणी एका शहरात घुसल्याने इमारती कोसळल्या आहेत. किनारी परिसरात असलेल्या डेर्ना या शहरात 30 हजारांहून आधिक नागरिक बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती इंटरनॅशनल ऑर्गनायजेशन फॉर मायग्रेशनने दिली.

Libya Flood : लिबियात पावसाचा हाहाकार ! धरणे फुटली, इमारती वाहिल्या; दोन हजारांहून अधिक जणांचा मृत्यू

या महापुरात (Libya Flood) अनेक इमारती कोसळल्या आहेत. त्यामुळे सगळीकडे ढिगारे दिसत आहेत. या ढिगाऱ्यांखाली दहा हजारांपेक्षा जास्त लोक दबले गेले असावेत तेवढेच लोक समुद्रात वाहून गेले असावेत अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. किनारी भागात राहणाऱ्या शहरांमध्ये सुमारे एक लाख लोक राहत होते असे येथील स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. डेर्ना शहरातील वरच्या भागातील दोन धरणे फुटल्याने या शहरात पाणी घुसले आहे. त्यानंतर या शहरातील इमारती कोसळल्या असल्याचे व्हिडिओ, फोटोज ही समोर आले आहे. या शहरातील रस्त्यांवर मृतदेह दिसून येत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, मागील आठवड्यात ग्रीस देशात डॅनिअल वादळाचा फटका बसला होता. त्यानंतर या वादळाने भूमध्य समुद्रात प्रवेश केला आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस झाला आहे. पुरामुळे दोन्ही धरणे फुटली आहे. या धरणांचे पाणी डर्ना शहरात घुसले आहे. हे शहर हे डोंगरात वसलेले आहे. या शहरात पाणी भरलेले आहे. तर इमारतीही कोसळल्या आहेत. तर दुसरे सर्वात मोठे शहर बेंगाजीसहित समुद्रा किनारासह इतर भागांना पुराचा फटका बसला आहे.

‘शेवटी चीनचा खरा नकाशा सापडला’; मनोज नरवणेंकडून फोटो ट्विट…

संघर्षानंतर लिबियाची अवस्था वाईट

लिबिया या देशातील राजकीय संघर्ष आहे. पूर्व व पश्चिम दोन भागात हा देश वाटला गेलेला आहे. 2011 मध्ये झालेल्या विद्रोहानंतर येथील सार्वजनिक सेवा संपलेल्या आहेत. तर या देशात संघर्ष सुरू आहे. त्रिपोलीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्यानंतर लिबिया सरकार पूर्व भागात नियंत्रण ठेवू शकत नाही. अशा संकटात अडकलेल्या या देशात महापुराने (Libya Flood) थैमान घातले आहे. येथील परिस्थिती सध्या भीषण बनली आहे. सगळीकडे मातीचे ढिगारे आणि पाणीच पाणी दिसत आहे.

Tags

follow us