Download App

मोठी बातमी! पाकिस्तानमधील हवा विषारी, पंजाबमधील 2 शहरांत लॉकडाऊन

  • Written By: Last Updated:

Poisonous Air In Pakistan Lockdown In 2 Cities In Punjab : पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आलीय. तेथील हवात विषारी झाल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालीय. या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने लाहोर आणि मुलतानमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा केलीय. शुक्रवार ते रविवारपर्यंत हे लागू होणार (Poisonous Air In Pakistan) आहे. या दोन शहरांमध्ये हवेच्या प्रदूषणाच्या पातळीत कमालीची वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. गेल्या काही आठवड्यांपासून पंजाबमधील अनेक शहरांमध्ये दाट धुके पसरले आहे. लाहोर आणि मुलतानला सर्वाधिक फटका बसला आहे. मुलतानमधील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) आधीच 2,000 ओलांडला आहे, ज्यामुळे वायू प्रदूषणाचा एक नवीन विक्रम निर्माण (Lockdown In Punjab) झालाय.

पंजाबच्या मंत्री मरियम औरंगजेब यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “आम्ही लाहोर आणि मुलतानमध्ये आरोग्य आणीबाणी जाहीर करत आहोत. शुक्रवार ते रविवार या दोन्ही शहरांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

महायुतीचे उमेदवार जगताप यांच्या प्रचारार्थ शिवसेना व भाजप सरसावली, आगरकर मळा परिसरातून काढली एकत्रित रॅली

लाहोर आणि मुलतानमधील बांधकामे पुढील 10 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहेत. बांधकाम साहित्याने भरलेल्या वाहनांना शहरात येण्यापासून रोखले जाईल. याशिवाय शाळाही बंद आहेत. महाविद्यालये आणि विद्यापीठे ऑनलाइन वर्ग आयोजित करतील. सरकारी आणि खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे. रेस्टॉरंट फक्त 4 वाजेपर्यंत उघडतील आणि रात्री 8 वाजेपर्यंत टेकवे सेवा दिली जाईल. मरियम औरंगजेब म्हणाल्या की, या धुक्याच्या मोसमात विवाहसोहळ्यांवर कोणतेही निर्बंध लादले जात नाहीत.

मोनिका राजळेंची हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी मदत करा, पंकजा मुंडेंचे आवाहन

मरियम औरंगजेब यांनी असंही सांगितलं की, लाहोरमध्ये केवळ 3 टक्के हिरवळ आहे, तर 36 टक्के हिरवा भाग असायला हवा होती. हे पाहता शासनाने शहरभर वृक्षारोपण मोहीम राबविण्याचे नियोजन केलंय. या व्यतिरिक्त, कृषी विभागाने शेतकऱ्यांना त्यांचे खवले जाळण्याऐवजी नष्ट करण्यासाठी 1,000 सुपर सीडर दिले आहेत. 800 वीटभट्ट्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. लाहोरमध्ये जंगले वाढवण्याच्या दिशेनेही पावले उचलली जात आहेत.

 

follow us