India-China Army : LAC वर सध्या मोठी घडामोड घडत आहे. भारत आणि चीनच्या (India-China) पूर्व लडाख सेक्टरमधील डेपसांग (Depsang) आणि डेमचोक (Demchok) भागातील सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. माहितीनुसार या भागात सध्या जागा मोकळी करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा हटवण्यासाठी भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांच्या वतीने पडताळणी करत आहेत.
देपसांग आणि डेमचोकमधील भारतीय आणि चिनी सैन्याच्या माघारीची प्रक्रिया आज किंवा उद्या पूर्ण होण्याची माहिती देखील समोर आली आहे. लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2020 मध्ये झालेल्या गोंधळानंतर ज्या भागात ते पोहोचू शकले नाहीत अशा भागात दोन्ही सैन्य आता गस्त घालण्यास सुरुवात करणार आहे.
भारत – चीन करार
पूर्व लडाखमधील LAC वर गस्त घालण्यावरून चार वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेला लष्करी विरोध संपवण्यासाठी भारताने 21 ऑक्टोबर 2024 रोजी चीनशी करार करण्यास सहमती दर्शवली होती. दोन्ही देशांदरम्यान विश्वास निर्माण होण्यास वेळ लागेल, मात्र सैन्य मागे घेणे महत्त्वाचे आहे. दोन महत्त्वाच्या टप्प्यांवर सैन्य मागे घेणे ही पहिली पायरी आहे आणि तणाव कमी करणे ही पुढची पायरी आहे. असं भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले.
ग्राउंड कमांडर्सच्या बैठका दररोज होणार तर दुसरीकडे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी भारत आणि चीन 29 ऑक्टोबरपर्यंत LAC वर तोडगा काढण्याची प्रक्रिया पूर्ण करतील.
माहितीनुसार, नियमित ग्राउंड कमांडर्सच्या बैठका सुरूच राहतील गस्तीमध्ये सामील असलेल्या सैन्याची संख्या ओळखण्यात आली आहे आणि आम्ही गस्तीच्या शेडमध्ये किंवा तंबू, सैन्यासारख्या सर्व तात्पुरत्या पायाभूत सुविधांवर कोणताही गैरसमज टाळण्यासाठी आम्ही एकमेकांना सूचित करतो. दोन्ही बाजूंनी या भागात पाळत ठेवली जाईल. अशी माहिती समोर आली आहे.