Download App

पाकिस्तानात पाणी पेटलं! सिंध प्रांतातील लोक रस्त्यावर, वाहतूक अडवली; नेमकं काय घडलं?

पाकिस्तानातील सिंध प्रांतात लोक रस्त्यावर उतरले असून पाकिस्तानी सेना आणि सरकारविरोधात निदर्शने करत आहेत.

Pakistan News : पाकिस्तानने भारताशी पंगा घेतला आहेच पण आता पाकिस्तानला त्यांच्या देशातच संकटांना तोंड द्यावे लागत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर निर्णय घेतले आहेत. सिंधू पाणीवाटप करार स्थगित केला आहे. यानंतर पाकिस्तानात हाहाकार उडाल आहे. दुसरीकडे पाकिस्तानातील सिंध प्रांतात असंतोष उफाळून आला आहे. सिंध प्रांतात लोक रस्त्यावर उतरले असून पाकिस्तानी सेना आणि सरकारविरोधात निदर्शने करत आहेत.

सिंध प्रांतात सहा कालव्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. यातील पाच कालवे सिंधू नदीवर तर एक कालवा सतलज नदीवर एक कालवा बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पांचे काम ग्रीन पाकिस्तान इनिशिएटव अंतर्गत सुरू करण्यात आले आहे. पंरतु, या प्रकल्पांतून सैन्याकडून लूट केली जात असल्याचा आरोप येथील नागरिकांना केला आहे. वाढता विरोध पाहता सरकारने हा प्रकल्पच रद्द करण्याची घोषणा केली आहे. यानंतरही लोकांचा राग शांत झाला नाही. वृत्त लिहीपर्यंत लोकांनी हायवे जाम केला होता. हायवे ब्लॉकेड हटवण्यास लोक तयार नव्हते.

काहीतरी मोठं घडणार? वेळ अन् टार्गेट तुम्हीच ठरवा, PM मोदींचा सैन्याला फ्रि हँड

मागील बारा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेच. व्यवसाय ठप्प झाले आहेत. कराची बंदरातून देशभरात विविध साहित्य घेऊन जाणारे ट्रक रस्त्यातच अडकले आहेत. जवळपास एक लाख डॉक्टर आणि कर्मचारी अडकून पडले आहेत. हा प्रकल्प ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव्हचा भाग आहे. या प्रकल्पांसाठी सरकार जवळपास 3.3 अब्ज डॉलर खर्च करणार आहे. यामुळे पंजाब, सिंध आणि बलुचिस्तानमधील तब्बल 48 लाख एकर जमिनीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. सन 2023 मध्ये या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी आताचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सेना प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी या प्रकल्पाचे लाँचिंग केले होते.

पाकिस्तानी सैन्याची एक खासगी कंपनी प्रकल्प राबवणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून पाकिस्तानातील शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचा उद्देश होता. परंतु, सिंधमधील लोकांना संशय आहे यातून कमी मिळेल. 1991 मधील पाणी करारानुसार सिंध प्रांताला त्यांच्या हिश्श्यापैकी 20 टक्के पाणी आधीच कमी मिळत आहे. रब्बी हंगामात पाण्याची टंचाई 45 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

follow us