MDH and Everest spices banned in Maldives : MDH आणि एव्हरेस्ट (Everest Masala) या भारतातील दोन नामांकित मसाले उत्पादक कंपन्यांच्या काही उत्पादनांवर सिंगापूर आणि हाँगकाँगने बंदी घातली. या उत्पादनांमध्ये कर्करोगाला कारणीभूत ठरणारी कीटकनाशके मोठ्या प्रमाणात आढळून आल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर आता मालदीवनेही (Maldives) या मसाल्यांच्या विक्रीवर मालदीवममध्ये बंदी घातली आहे.
Pakistan Team : टीम इंडियाच्या विश्वचषकाचा ‘हिरो’, पाकिस्तानचा हेड कोच; PCB ने केलं कन्फर्म
मसाल्यात इथिलीन ऑक्साईड आढळले
MDH मसाले आणि एव्हरेस्ट मसाले हे भारतातील मसाल्यांचे लोकप्रिय ब्रँड आहेत. MDH ची 60 हून अधिक उत्पादने बाजारात आहेत. एव्हरेस्टचेही अनेक मसाले बाजारात उपलब्ध आहेत. या मसाल्यांवर बंदी घालतांना मालदीवच्या अन्न आणि औषध प्राधिकरणाने सांगितले की, MDH आणि एव्हरेस्ट या दोन मसाल्यांच्या ब्रँडमध्ये इथिलीन ऑक्साईड सापडले आहे, त्यामुळं मसाल्यांवर बंदी घातली, असे एमएफडीएने निवेदनात म्हटले आहे.
मालदीव मीडियाच्या वृत्तानुसार, मसाल्यांच्या पॅकेटमध्ये इथिलीन ऑक्साईड आढळून आले आहे, जे कृषी उत्पादनांमध्ये वापरले जाते. त्याच्या प्रतिकूल परिणामांमुळे, अन्न उत्पादनांमध्ये वापरण्याची शिफारस केलेली नाही. सिंगापूर फूड एजन्सी आणि हाँगकाँगच्या फूड सेफ्टी सेंटरने ग्राहकांना ही उत्पादने न वापरण्याचा सल्ला दिला आहे, असेही एमएफडीएने म्हटले आहे. प्राधिकरणाने सांगितले की या ब्रँडचे मसाले मालदीवमध्ये मोठ्या प्रमाणात आयात केले जातात.
इथिलीन ऑक्साईड किती धोकादायक आहे?
इथिलीन ऑक्साईड हे एक धोकादायक रसायन आहे. या रसायनामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. यामुळे डीएनए, मेंदू आणि मज्जासंस्थेचे नुकसान होऊ शकते. अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मते, इथिलीन ऑक्साईडमध्ये डीएनए खराब करण्याची क्षमता आहे. या इथिलीन ऑक्साईड खाण्यात आल्यास लिम्फोमा आणि ल्युकेमिया होऊ शकतो. याशिवाय पोट आणि स्तनाचा कर्करोग होऊ शकतो.