Microsoft : पुढील 12 ते 18 महिन्यांमध्ये ‘व्हाईट कॉलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नोकऱ्या पूर्णपणे स्वयंचलित करु शकते, म्हणूनच तुमची नोकरी जाणार असल्याचा इशारा मायक्रोसॉफ्टचे (Microsoft ) एआय प्रमुख मुस्तफा सुलेमान (Mustfa Suleman) यांनी केलंय. सुलेमान यांच्या इशाऱ्यामुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या कामगार वर्गाची झोप उडून गेलीयं.
मार्गदर्शनात्मक पद्धतीने केली जाणारी कामे आता थेट एआयकडे हस्तांतरित केली जाणार आहेत. एआय आता मानवांच्या बरोबरीने किंवा त्यांच्यापेक्षाही चांगली कामगिरी करु शकतात. संगणकावर आधारीत व्यवसायांना सर्वाधिक धोका असून यामध्ये कायदा, लेखांकन, विपणन, प्रकल्प व्यवस्थापन क्षेत्रांचा समावेश आहे.
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडमध्ये; संशयित कुटुंबाची 8 तास चौकशी
पुढील काळात एआय प्रणाली क्षेत्रातील बहुतेक काम हाताळू शकणार आहेत, असं विधान मुस्तफा सुलेमान यांनी केलंय. याआधी तंत्रज्ञान कंपन्यांनी एआयला मानवांना मदत करणारे साधन म्हणून वर्णन केले होते पण आता पहिल्यांदाच एआय मानवांची जागा घेऊ शकतं, असं उघडपणे सांगितलं जात आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रात एआयच्या वाढत्या प्रभावाची चिन्हे आधीपासूनच दिसू लागली असून अनेक सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आता एआय साधनांचा वापर करुन विकसित करीत आहे. त्यामुळे कामांचा वेग वाढाल असून कंपन्या कमी कर्मचाऱ्यांसह अधिक काम करण्याच्या शक्यतेचाही शोध घेत आहेत.
शांतता करार नाही तर इराणला वाईट काळाचा सामना करावा लागेल, ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ
दरम्यान, तज्ज्ञांच्या म्हणण्यानूसार एआय आता केवळ कामापुरतेच मर्यादित नसून डेटा विश्लेषण, निर्णय घेणे यांसारख्या गुंतागुंतीच्या कामांसाठीही अधिक सक्षम होत आहे. त्यामुळे बड्या कंपन्या एआय आधारित प्रणालींमध्ये गुंतवणूक करीत आहेत.
पुढील दोन ते तीन वर्षांत एआय एजंटस् कंपन्यांमधील संपूर्ण कार्यप्रवाह हाताळण्यास सुरुवात करणार आहेत. एआय प्रणाली बैठकांचे वेळापत्रक, प्रकल्पांचा मागोवा, अहवाल तयार करणार आहे. त्यामुळे आता मानवांची भूमिका हळू हळू कमी होण्याची शक्यता आहे.
तज्ञांच्या मते प्रत्येक तांत्रिक बदल नव्या संधी घेऊन येत असतो. इंटरनेट आणि संगणकामुळे अनेक नोकऱ्याच्या संधी उपलब्ध झाल्या, तशाच एआयदेखील नव्या प्रकारच्या नोकऱ्या निर्माण करु शकते. एआय प्रशिक्षण, डेटा व्यवस्थाप, सायबर सुरक्षा, मशीन पर्यवेक्षण, अशा क्षेत्रात मागणी वाढण्याची अपेक्षा तज्ञांकडून व्यक्त
