Myanmar Air strike: गेल्या दोन दिवसांपासून इस्त्रायल (Israel) आणि पॅलेस्टाईन यांच्यात युध्दाचा भडका उडला आहे. आतापर्यंत या संघर्षात हजारो निरापराध लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. अशातच आता म्यानमारमधील (Myanmar) विस्थापितांच्या छावणीवर हवाई हल्ला (Air Strike) झाल्याचं वृत्त आहे. काचिनमध्ये झालेल्या या हल्ल्यात आतापर्यंत तब्बल 29 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत.
‘ससूनमध्ये मंत्री भुसेंचा फोन’; दादा भुसेंनी सुषमा अंधारेंचे आरोप फेटाळले
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, म्यानमारच्या उत्तर-पूर्व भागात विस्थापित लोकांसाठी बांधलेल्या कॅम्पवर लष्कराने हल्ला केला आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा हल्ला काचिन इंडिपेंडन्स आर्मी कॅम्पपासून काही अंतरावर झाला आहे. यासंदर्भातील काही छायाचित्रेही समोर आली आहेत. हा कॅम्म काचिन इंडिपेंडन्स ऑर्गनायझेशन (KIO) च्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात आहे. या संघटनेची गणना म्यानमारमधील वांशिक बंडखोर गटांमध्ये केली जाते जे अनेक दशकांपासून त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत.
गोळीबाराला लष्कर जबाबदार
स्थानिक सूत्रांच्या हवाल्याने या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यापैकी 29 जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
सत्तापालटानंतर म्यानमारमध्ये लष्कराचे नियंत्रण आहे. लष्करी सरकारला विरोध करणाऱ्यांना सरकार लक्ष्य करत असल्याचा आरोपही अनेकदा करण्यात आला आहे. तब्बल 63 वर्षांनंतर काचिनमध्ये असा प्राणघातक हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शैडो नेशनल यूनिटी गवर्नमेंट (NUG) ने गोळीबारासाठी लष्कराला जबाबदार धरले आहे.
लष्कराने विमानातून अतिशय शक्तिशाली बॉम्ब टाकल्याचा दावा केला जात आहे. या हल्ल्यात 59 जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या भागात हा हल्ला झाला तो लायझा भाग केआयएची राजधानी आहे. सैन्यासोबतच्या संघर्षात केआयए हा सर्वात मोठा गट आहे. या भागात लष्कराच्या अत्याचारामुळे अजूनही हजारो लोक अजूनही विस्थापित छावण्यांमध्ये राहत आहेत.
काचिन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांनी लष्करी सरकारशी लढणाऱ्या इतर बंडखोर गटांना वाढत्या पाठिंब्यामुळे केआयओच्या ताब्यातील भागांवर हल्ले वाढवले आहेत.
लष्कराच्या ताब्यानंतर हवाई हल्ल्यांमध्ये वाढ
सत्ता हाती घेतल्यानंतर लष्कराने विरोधकांच्या ताब्यातील शहरे आणि भागांवर हवाई हल्ले तीव्र केले आहेत. छावणीवर बॉम्ब पडल्यानंतर हा स्फोट एवढा धोकादायक होता की संपूर्ण शहर हादरल्याचे दिसले. स्फोट होताच नागरिक घराबाहेर पडले.
लष्कराने आणीबाणीची मुदत 6 महिन्यांनी वाढवली
2021 मध्ये सत्तापालट करणाऱ्या म्यानमारमध्ये तेथील लष्कराने या वर्षी जुलैमध्ये आणीबाणीचा कालावधी 6 महिन्यांनी वाढवला आहे. देशातील आणीबाणी 31 जुलै रोजी संपणार होती. यापूर्वी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन आणीबाणी वाढवण्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे ऑगस्टमध्ये होणाऱ्या निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या.