NASA Power Outage : गेल्या काही दशकांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमेंकाचे प्रतिस्पर्धी असलेले रशिया आणि अमेरिका यांच्यात मंगळवारी वेगळंच चित्र जगाने पाहिले. अमेरिकेतील ह्यूस्टन येथील नासाच्या कार्यालयातील लाईट गेल्याने मिशन कंट्रोल आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (International Space Station) यांच्यातील संपर्क तुटला. त्यामुळे मिशन कंट्रोल रूममधून स्पेस स्टेशनला कमांड पाठवता आले नाही आणि कक्षेत असलेल्या सात अंतराळवीरांशी संवाद साधता आला नाही. त्यावेळी रशिया अमेरिकेच्या मदतीला आला.
स्पेस एजन्सीला बॅकअप कंट्रोल सिस्टमवर अवलंबून राहण्याची ही पहिलीच वेळ होती. तसेच आउटेजच्या 20 मिनिटांच्या आत, रशियन कम्युनिकेशन सिस्टमला बोलावण्यात आले आणि त्याद्वारे अंतराळवीरांना समस्येबद्दल माहिती देण्यात आली. ह्युस्टनच्या जॉन्सन स्पेस सेंटरच्या इमारतीत अपग्रेडिंगचे काम सुरू असताना वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे NASA मध्ये सुमारे 90 मि
निटे लाईट गेली होती.
ODI World Cup 2023: भारत आणि पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याची तारीख बदलणार?
स्पेस स्टेशन प्रोग्राम मॅनेजर जोएल मॉन्टेलबानो म्हणाले की अंतराळवीर किंवा स्टेशनला कोणताही धोका नव्हता आणि बॅकअप कंट्रोल सिस्टमने 90 मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात आणली. वीज खंडित झाल्यानंतर 20 मिनिटांच्या आत, अंतराळवीरांना रशियन कम्युनिकेशन सिस्टमद्वारे समस्येची माहिती देण्यात आली. ते म्हणाले की नासाची अपेक्षा आहे की कमी वेळेत समस्येचे निराकरण होईल आणि परिस्थिती सामान्य होईल.
केंद्राची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव; ED चे संचालक संजय मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्याची मागणी
रशियासोबत ताणलेल्या संबंधानंतर अमेरिकेच्या अंतराळ संस्थेला रशियाची मदत घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्पेस वॉर असूनही दोन्ही देशांच्या अंतराळ संस्था एकत्र येऊन काम करत आहेत. काही दिवसांपूर्वी रशियाने म्हटले आहे की ते 2024 नंतर अंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमधून माघार घेईल आणि त्याऐवजी स्वतःचे स्टेशन तयार करेल.