ODI World Cup 2023: भारत आणि पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याची तारीख बदलणार?

ODI World Cup 2023: भारत आणि पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याची तारीख बदलणार?

India vs Pakistan : 2023 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमी या महामुकाबल्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहात आहेत. पण आता या सामन्याची तारीख बदलली जाणार आहे. सुरक्षा यंत्रणांनी बीसीसीआयला नवरात्रोत्सवाचे कारण देत तारीख बदलण्याचे सांगितले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट विश्वचषकाची तारीख बदलली जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नियोजित होता. या दिवशी संपूर्ण गुजरातमध्ये गरबा साजरा केला जातो. सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयला सामन्याच्या वेळापत्रकावर पुनर्विचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सामन्यांच्या तारखा बदलल्या तर चाहत्यांना धक्का असणार आहे. अनेकांनी सामन्याच्या दिवशीच्या हॉटेल्स आणि फ्लाइटचे बुकिंग केले आहे. अनेकांनी क्रिकेट सामन्यांची तिकिटे आधीच बुक केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आता भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबर रोजी होऊ शकतो.

केंद्राची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव; ED चे संचालक संजय मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्याची मागणी

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सामन्याच्या वेळेत बदल होणे हे सोपे काम नाही. कारण सामन्याची वेळ बदलली तर अनेक गोष्टींवर परिणाम होतो. म्हणूनच निर्णय घेताना प्रत्येक गोष्टीचा विचार केला जाईल. याबाबत अंतिम चर्चा झाल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. गरज असेल तर तारीख बदलली जाऊ शकते.

मोठी बातमी : कोळसा घोटाळा प्रकरणी माजी खासदार विजय दर्डांसह मुलाला 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत संपूर्ण विश्वचषकाचे आयोजन करत आहे. विश्वचषक स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube