Nepal Helicopter Crashes : नेपाळमधून (Nepal) एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार, नेपाळमध्ये पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. माहितीनुसार, नेपाळमधील नुवाकोटच्या (Nuwakot) शिवपुरी जिल्ह्यात एअर डायनेस्टीचे हेलिकॉप्टर (Air Dynasty helicopter Crashes) कोसळले असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत पायलटसह चार जणांचा मृत्यू झाला आहे.
माहितीनुसार, एअर डायनेस्टी हेलिकॉप्टरने काठमांडूहून (Kathmandu) रसुवालाकडे जात होता. या हेलिकॉप्टरमध्ये चार चिनी नागरिकांसह पाच लोक होते. सीनियर कॅप्टन अरुण मल्ला हेलिकॉप्टरचे पायलट होते अशी देखील माहिती समोर आली आहे.
TIA येथे टेकऑफ झाल्यानंतर तीन मिनिटांनी हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, हेलिकॉप्टर काठमांडूहून रसुवाला जात असताना नुवाकोट जिल्ह्यातील सूर्या चौर-7 येथे एका टेकडीवर कोसळले.
A chopper belonging to Air Dynasty with the registration number 9N-AND has been crashed at Suryachaur in Nuwakot near Kathmandu while flying to Rasuwa. Captain Arun Malla was flying the chopper carrying four passengers. Update continue…#Nepal #Aviation #AvGeek @flightradar24 pic.twitter.com/ZD7pAQATuP
— Susheel Bhattarai (@sushbhattarai) August 7, 2024
विमान अपघातात 18 जणांचा मृत्यू
तर यापूर्वी देखील नेपाळमध्ये विमान अपघात झाला होता. ज्यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला होता. 25 जुलै रोजी राजधानी काठमांडूच्या विमानतळावरून उड्डाण घेत असताना नेपाळच्या सौरी एअरलाइन्सचे बॉम्बार्डियर सीआरजे 200 विमान कोसळले होते आणि विमानाला आग लागल्याने 18 जणांचा मृत्यू झाला होता. या विमानात 19 लोक बसले होते. या दुर्घटनेत फक्त पायलट वाचला होता तर इतर 18 जणांचा मृत्यू झाला होता.
Tata Curvv EV ने बाजारात घेतली कडक एन्ट्री, देणार 585Km रेंज, किंमत आहे फक्त …