इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन; वाचा, नक्की काय घडलं

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन; वाचा, नक्की काय घडलं

Iran President Death : इराणसाठी मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टपर दुर्घटनेत निधन झाल्याची घटना घडली आहे. अजरबैजानवरुन परतताना इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टरला हा अपघात झाला. खराब हवामानामुळे इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आलं आहे. (Iran President) काल संध्याकाळी या हेलिकॉप्टरची हार्ड लँडिंग केल्याची बादमी समोल आली होती.

 

दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर सापडलं

इब्राहिम रईसी यांचा अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टरशी संपर्क झाला नाही. ढगाळ वातावरण, आभाळ आल्याने सर्वत्र काळोख होता. त्या परिस्थितीमध्ये बचाव पथकाला हेलिकॉप्टरचा शोध लावण्यात अनेक अडचणी आल्या. दरम्यान, मोठ्या परिश्रमानुसार इराणी मीडिया रेड क्रिसेंटनुसार, बचाव पथकाला दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर सापडलं आहे.

 

या हेलिकॉप्टरचे क्रॅश झालेले काही फोटो समोर आले आहेत. या भीषण अपघातातून कोणी वाचण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. याबाबत इराणच्या सरकारी टेलीविजनवर सांगितलं की, राष्ट्रपती इब्राहिम रईसी आणि अन्य अधिकारी असलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये कोणी जिवंत असण्याचे संकेत मिळत नाहीत.

 

अंगरक्षकही सोबत होते

रईसी अजरबैजान प्रांताच्या दौऱ्यावर गेले होते. मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना इराणची राजधानी तेहरानपासून 600 किलोमीटर (375 मैल) उत्तर-पश्चिमेला अजरबैजान देशाच्या सीमेला लागून असलेल्या जुल्फा शहराजवळ घडली. या हेलिकॉप्टरमध्ये राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री हुसैन अमीराब्दुल्लाहियन, पूर्व अज़रबैजानचे अयातुल्ला अल-हाशेम आणि पूर्व अजरबैजान प्रांताचे गवर्नर मालेक रहमतीसोबत त्यांचे अंगरक्षकही होते.

 

इराण हवामान विभागाचा अंदाज काय?

पाऊस आणि दाट धुक्यांमुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अनेक अडचणी आल्या. दुर्घटना घडली, त्या ठिकाणी हवामान खूप खराब होतं. दरम्यान, इराणच्या हवामान विभागाने हे वातावरण अजून खराब होऊ शकतो असा अंदाज वर्तवला आहे. पाऊस आणि बर्फवृष्टीचाही अंदाज वर्तवण्यात आलाय.

 

हेलिकॉप्टरचा शोध कसा लागला?

टर्कीच्या ड्रोनने या हेलिकॉप्टरचा शोध लावला. या ड्रोनने एक हीट सोर्स शोधून काढलं. तोच हेलिकॉप्टरचा ढिगारा होता. टर्कीच्या अधिकाऱ्यांनी तेहरानच्या वरिष्ठांना घटनास्थळाबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube