ताश्कंद : उझबेकिस्तानमध्ये भारतीय कफ सिरपमुळे (Indian cough syrup) ६५ मुलांचा मृत्यू झाला. त्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय कफ सिरप वितरकांनी अनिवार्य चाचण्यांपासून सवलत मिळावी, यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना सुमारे $33,000 (सुमारे 2.8 दशलक्ष) रुपये लाच दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. उझबेकिस्तानमधील (Uzbekistan) सरकारी वकिलांनी हा धक्कादायक आरोप केला आहे.
मध्य आशियातील उझबेकिस्तानमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या मृत्यूप्रकरणी एकवीस जणांवर खटला सुरू आहे. यामध्ये 21 उझबेकी आणि एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे. प्रतिवादींपैकी तीन (एक भारतीय आणि दोन उझबेकी नागरिक) कुरार्मॅक्स मेडिकलचे अधिकारी आहेत. ही कंपनी उझबेकिस्तानमध्ये भारताच्या मॅरियन बायोटेकच्या औषधांची विक्री करते.
Tirupati Balaji च्या दर्शनाला जाताना घ्यावी लागणार ‘ही’ काळजी
सरकारी वकील सॅदकरिम अकिलोव्ह यांच्या म्हणण्यानुसार, कुरार्मॅक्सचे सीईओ सिंग राघवेंद्र प्रतार यांनी सरकारी अधिकाऱ्यांना US$33,000 ची लाच दिली. कफ सिरपची अनिवार्य चाचणी टाळण्यासाठी ही लाच देण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी दिली. तथापि, उझबेकिस्तानमध्ये भारतीय कफ सिरपची चाचणी झाली की नाही हे सरकारी वकिलांच्या विधानांवरून अद्याप सस्पष्ट झालेलं नाही.
या प्रकरणी प्रतार यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी त्यांच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र, त्यांनी अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी मध्यस्थामार्फत पैसे दिल्याचे मान्य केलं. पैसे कोणी आणि कसे वापरले याची माहिती आपल्याला नसल्याचे प्रतार यांनी सांगितले. दरम्यान, 21 पैकी सात प्रतिवादी कोणत्या ना कोणत्या प्रकरणात दोषी ठरवले गेले आहेत. चोरी, बनावट औषधांची विक्री, पदाचा गैरवापर, बेजबाबदारपणा, लाचखोरी, कट रचणे अशा गुन्ह्यांत ते दोषी आढळले आहेत. त्यामुळं त्यांच्यावर सरकार काय कारवाई करते, हेच पाहणं महत्वाचं आहे.