Download App

Nobel Peace Prize 2023 : इराणच्या नर्सिस मोहम्मदी यांनी शांततेचा नोबेल पुरस्कार, महिला अत्याचाराविरोधात उभारला लढा

  • Written By: Last Updated:

Nobel Prize जगातील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची (Nobel Prize) सध्या घोषणा सुरू आहे. यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार इराणच्या नर्गिस मोहम्मदी (Nargis Mohammadi) यांना जाहिर झाला आहे. नर्गिस मोहम्मदी यांनी इराणमधील (Iran) महिला अत्याचाराविरुद्धच्या लढ्यात मोलाचं योगदान दिले आहे.

तोंडाला मस्क लावून घरात नोटा मोजत होते, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार 

नर्गिस मोहम्मदी यांनी इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्ध मोठा लढा उभारला. मानवी हक्क आणि महिला स्वातंत्र्याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी उभारलेल्या लढ्यांची आणि केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला करण्यात आला. एक मेडल आणि सुमारे 8.33 कोटी रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

नर्गिस मोहम्मदी या इराणी मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. त्या डिफेंडर्स ऑफ ह्युमन राइट्स सेंटर (DHRC) च्या उपाध्यक्षा देखील आहेत. इराणमधील फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी आणि कैद्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी मोठा लढा उभारला होता. आणि त्यांच्या लढ्याला यश देखील आलं होतं. नर्गिस मोहम्मदी यांना मानवी हक्कांविरोधात लढा देतांना अनेकदा तुरंगवासही झाला आहे.

51 वर्षीय नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर होत असतांना त्या तुरुगांत आहेत. इराण सरकारच्या विरोधात प्रपोगंड पसरवण्याच्या आरोपाखाली त्या 31 वर्ष तुरुंगात आहेत.

नर्गिस मोहम्मदी यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. नर्गिस मोहम्मदी यांना इराणच्या तुरंगात महिलांशी होणाऱ्या गैरवर्तनाविरोधात आवाज उठवला. त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले. त्या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये पर अँगर अवॉर्ड, ओलोफ पाल्मे अवॉर्ड, युनेस्को/ग्युलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम अवॉर्ड आणि पेन/बार्बी फ्रीडम टू रायट अवॉर्ड या पुरस्कारांचा समावेश आहे.

रसायनशास्त्रात नोबेल

यापूर्वी काल, 2023 चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. हा सन्मान यंदा मौंगी जी यांना संयुक्तपणे देण्यात आला. कोलंबिया विद्यापीठाचे बावेंडी, लुईस ई. ब्रुस आणि अॅलेक्सी आय यांना हा पुरस्कार जाहीर झाला.

वैद्यकशास्त्रातील नोबेल

कॅटलिन कॅरिको आणि ड्र्यू वीसमन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. न्यूक्लिओसाइड बेस मॉडिफिकेशनशी संबंधित शोधांसाठी त्यांचा सन्मान करण्यात आला. या शोधामुळे कोरोना विषाणू विरुद्ध प्रभावी mRNA लस विकसित करण्यात मदत झाली.

Tags

follow us