YouTube New Policy : युट्यूब (YouTube)हे उत्पन्नाचेही एक उत्तम साधन आहे. आज-काल अनेक लोक YouTube च्या माध्यमातून मोठी कमाई करतात. अनेकांचा व्हिडिओ बनवून युट्यूबवर अपलोड करणं हा पेशाच झाला आहे. बरेच लोक कोणतेही काम न करता YouTube साठी कंटेंट तयार करून चांगले पैसे कमवत आहेत. पण, युट्यूबच्या माध्यमातून पैसे कमावणं हे तितकचं अवघडही आहे. कारण, युट्यूबच्या अटींची पूर्तता करतांनाच अनेकांच्या नाकीनऊ येतं. मात्र, आता यूट्यूर्संसाठी आनंदाची बातमी आहे. युट्यूबने आपल्या पॉलिसीत काही बदल केले आहेत. (Now YouTube channel with 500 subscribers will also earn)
खरंतर YouTube हे जगभरातील सर्वात मोठा व्हिडिओ प्लॅटफॉर्म म्हणून लोकप्रिय माध्यम आहे. चॅनेल मोनेटाईज करून कमाई करण्याची सोय असल्यामुळं या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक जण चांगली कमाई करत आहेत. त्यामुळं यूट्यूबची लोकप्रियता आणि वापर झपाट्याने वाढत आहे. आता YouTube काही बदल केले आहेत. YouTube ने म्हटलं आहे की, आम्ही YouTube पार्टनर प्रोग्रामसाठी पात्रता निकषात काही बदल करत आहोत. कंपनीने कमी सबस्काईबर्स असलेल्या क्रिएटरसाठी मोनेटाईजची प्रक्रिया सोपी केली. त्यासाठी YouTube ने आपले कमाई धोरण काहीसे शिथिल करून नियम आणखी सोपे केले आहेत.
Sharada Rajan Ayyangar : प्रसिद्ध गायिका शारदा राजन अय्यंगार यांचं निधन; रेखा-हेमामालिनीला दिला आवाज
दरम्यान, YouTubers वर आता तुमचे कमी सबस्क्राईबर्स असले तरीही चांगली कमाई करता येणार आहे. यामुळे यूट्यूबला उत्पन्नाचे साधन म्हणून पाहणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. YouTube ने चॅनेलच्या माध्यमातून कमाई करण्यासाठी आधी गेल्या 90 दिवसांमध्ये 1,000 सबस्क्राईबर संख्या, 4,000 तासांचा वॉचटाइम आणि शॉर्ट व्हिडिओला 10 दशलक्ष व्ह्यूजची आवश्यकता होती. मात्र, यात आता यूट्यूबने काही बदल केले आहेत. नवीन धोरणानुसार, आता YouTube निर्मात्यांना त्यांच्या चॅनेलवर कमाई करण्यासाठी फक्त 500सबस्क्राईबर्स, 3,000 तासांचा वॉचटाइम आणि 3 लहान व्हिडिओला 3 दशलक्ष व्ह्यूज आवश्यकता असेल.
थोडक्यात, नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार YouTube निर्माते जितक्या लवकर व्ह्यू आणि सदस्य गोळा करू शकतील तितक्या लवकर त्यांच्या चॅनेलची कमाई केली जाईल.
यूट्यूब चॅनेलची कमाई करण्यासाठी नवीन धोरण
चॅनेलवर 500 सदस्य असणे आवश्यक आहे.
चॅनेलवरील व्हिडिओंचा पाहण्याचा वेळ 3,000 तासांचा असणे आवश्यक आहे.
YouTube लहान व्हिडिओंना 3 दशलक्ष व्हूज असणे आवश्यक आहे.
या अटी पूर्ण होताच, YouTube चॅनेलची कमाई सुरू होईल.