Flight Services Issues In USA : अमेरिकेतील संपूर्ण हवाई वाहतूक ठप्प झाल्याने संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली आहे. ‘फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन’ने (FAA) देशभरातील विमानतळांवरील उड्डाणे तात्पुरती थांबवली आहेत. एअर ट्रॅफिक कंट्रोलमधील कम्युनिकेशन बिघाडामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर हवाई सेवा पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती अमेरिकेच्या परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी शॉन डफी यांनी दिली.
7000 हून अधिक विमाने जमिनीवरच
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, संपूर्ण अमेरिकेत 7000 हून अधिक विमाने जमिनीवर थांबवून ठेवण्यात आली आहेत. 2023 मध्येही अशीच देशव्यापी समस्या उद्भवली होती, मात्र ती काही तासांतच सोडवण्यात आली होती. सध्याच्या हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) सिस्टीममध्ये विविध ‘एआय’ (AI) आधारित साधनांचा वापर केला जातो. काही तज्ज्ञांच्या मते, या घटनेमागे ‘एआय’शी संबंधित काही घटक कारणीभूत असू शकतात. विशेष म्हणजे, 12 नोव्हेंबर रोजी एटीसी सिस्टीममध्ये एक नवीन साधन (Tool) कार्यान्वित करण्यात आले होते.
मेष, मिथुनसह या राशींना आज होणार फायदा; मिळणार आर्थिक लाभ –
काही अहवालांनुसार, काही भागांतील दळणवळण सेवांमध्ये सुधारणा दिसून येत आहे. एका तज्ज्ञाच्या मते, जर ही समस्या आणखी 6 तास कायम राहिली, तर ती पूर्णपणे सोडवण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागू शकतो. याआधी, भारतातही मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सेवांमध्ये बिघाड झाल्यामुळे भारतीय विमान कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम झाला होता. इंडिगो (IndiGo), एअर इंडिया (Air India) आणि आकासा एअर (Akasa Air) यांसारख्या विमान कंपन्यांच्या ग्राहक सेवा (विशेषतः ईमेलद्वारे मिळणारी सेवा) विस्कळीत झाल्या होत्या.
