Sam Altman : एकीकडे अमेरिका आणि इराण युद्धाची चर्चा संपूर्ण जगात जोराने सुरु असताना दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात चॅटजीपीटी अॅपचे अनइंस्टॉलेशन करण्यात येत आहे. टेकक्रंचच्या अहवालानुसार, अमेरिकेत चॅटजीपीटी अॅपचे अनइंस्टॉलेशन एकाच दिवसात अंदाजे 295 टक्क्यांनी वाढले आहे. ओपनएआयने अमेरिकेच्या संरक्षण विभागाशी केलेल्या करारानंतर मोठ्या प्रमाणात चॅटजीपीटी अॅपचे अनइंस्टॉलेशन करण्यात येत असल्याचा दावा टेकक्रंचने या अहवालात करण्यात आला आहे.
तर आता या प्रकरणात ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या कराराबाबत माहिती दिली आहे. सॅम ऑल्टमन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ओपनएआयने संरक्षण विभागाशी करण्यात आलेल्या कराराबाबत माहिती दिली आहे. तसेच त्यांनी या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, कंपनीच्या एआय सिस्टमचा वापर अमेरिकन नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जाणार नाही. एआयचा वापर कायद्याच्या कक्षेत केला जाईल आणि देशांतर्गत देखरेखीसाठी जाणूनबुजून वापरला जाणार नाही. जर सरकारकडून कोणताही असंवैधानिक आदेश आला तर ते त्याचे पालन करणार नाहीत. लोकशाही प्रक्रिया ही सर्वोपरि आहे आणि जगाचे भविष्य ठरवण्यासाठी खाजगी कंपनीने नव्हे तर सरकारने निर्णय घ्यावेत असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
प्रकरण काय ?
टेकक्रंचच्या अहवालानुसार, ओपनएआय अमेरिकेच्या संरक्षण विभागासोबत काम करत असल्याची बातमी पसरताच, मोठ्या संख्येने लोकांनी चॅटजीपीटी अॅप (ChatGPT) डिलीट करण्यास सुरुवात केली आहे. फक्त एका दिवसात अनइंस्टॉलेशनमध्ये 295 टक्क्यांनी वाढ झाली. सोशल मीडियावरील लोकांनी एआय आता युद्ध यंत्राचा भाग बनत आहे का असा प्रश्न उपस्थित केला.
काही युजर्स म्हणतात की, एआय कंपन्यांनी सैन्यापासून अंतर राखले पाहिजे. काही जण असेही म्हणत आहेत की, जर एआय इतका शक्तिशाली असेल तर तो चुकीच्या हातात जाऊ नये म्हणून त्यांनी सरकारसोबत जबाबदारीने काम केले पाहिजे.
अँथ्रोपिकची भूमिका काय ?
या संपूर्ण वादात अँथ्रोपिक नावाची आणखी एक एआय कंपनीचा उल्लेख केला जात आहे. अहवालांनुसार, अँथ्रोपिकने काही अटींवर संरक्षण विभागाशी असहमती दर्शविली आणि स्पष्टपणे सांगितले की, त्यांचे तंत्रज्ञान सामूहिक देखरेख किंवा स्वायत्त शस्त्रांमध्ये वापरले जाऊ नये. यानंतर, ओपनएआयने आपला करार वाढवला. यामुळे एआय कंपन्या कोणत्या दिशेने जात आहेत याबद्दलच्या चर्चेला आणखी बळकटी मिळाली. ते सरकारसोबत काम करून सुरक्षा मजबूत करत आहेत की धोकादायक मार्गावर चालत आहेत?
तर दुसरीकडे सॅम ऑल्टमनने त्यांच्या पोस्टमध्ये असेही कबूल केले की या कराराबद्दल संवाद अधिक चांगला असू शकला असता. त्यांनी म्हटले की ही एक गुंतागुंतीची समस्या आहे आणि ती इतक्या लवकर सार्वजनिक करणे कदाचित योग्य दृष्टिकोन नव्हता. तंत्रज्ञान अद्याप अनेक बाबतीत पूर्णपणे तयार नाही आणि सुरक्षेबाबत अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. भविष्यात, ओपनएआय सरकारसोबत तांत्रिक सुरक्षा आणि एआयचा गैरवापर रोखण्यासाठी सुरक्षा उपायांवर काम करेल.
सॅम ऑल्टमन यांच्या पोस्टमध्ये काय?
या पोस्टमध्ये सॅम ऑल्टमन यांनी प्रथम सांगितले की, ओपनएआय आणि यूएस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स यांच्यातील करारात विशिष्ट भाषा जोडण्यात आली आहे जेणेकरून कंपनीची तत्त्वे पूर्णपणे स्पष्ट असतील. अमेरिकन नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी एआय सिस्टम जाणूनबुजून वापरल्या जाणार नाहीत. अमेरिकन संविधान, चौथी दुरुस्ती आणि एफआयएसए सारख्या कायद्यांचा हवाला देत त्यांनी सांगितले की सर्वकाही कायदेशीर चौकटीत असेल.संरक्षण विभागाला हे समजते की ही मर्यादा केवळ कागदावर नाही, तर याचा अर्थ असा आहे की ओपनएआयची तंत्रज्ञान कोणत्याही प्रकारच्या ट्रॅकिंग, देखरेख किंवा देखरेखीसाठी वापरली जाणार नाही.
पाकिस्तानला आणखी एक धक्का; रद्द होणार बांगलादेश मालिका, कारण काय?-
तर या पोस्टमध्ये ऑल्टमन यांनी हे देखील मान्य केले की हा निर्णय अतिशय संवेदनशील आहे, कारण तंत्रज्ञान सर्व गोष्टींसाठी तयार नाही आणि अनेक व्यवहार पूर्णपणे समजून घेणे बाकी आहे. त्यांच्या मते, ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे आणि भविष्यात सुरक्षा उपाय मजबूत केले जातील. त्यांच्या पोस्टच्या शेवटी, ऑल्टमन म्हणाले की जग वेगाने बदलत आहे आणि सरकार आणि टेक कंपन्यांमधील एआय संदर्भात संबंध खूप महत्वाचे असणार आहेत.
