Download App

दिल्लीत होणाऱ्या शांघाय कोर्पोरेशन ऑर्गेनायझेशन मिटींगचं पाकला निमंत्रण

नवी दिल्लीत होणाऱ्या शांघाय कोर्पोरेशन ऑर्गेनायझेशन (SCO)अंतर्गत नॅशनल सिक्युरिटी अॅडव्हायजर्स (NSA) ची मिटींग सुरू आहे. यामध्ये पाकिस्तानही सहभागी होणार आहे. भारताचे NSA अजित डोवाल यांनी या मिटींगची सुरूवात केली. यामध्ये चीनचे NSA व्हर्चुअली सहभागी होऊ शकतात. पाकिस्तानात सध्या कोणीही या पदावर नाही. त्यामुळे तेथील वरिष्ठ डिफेंस अधिकारी या मिटींगमध्ये सहभागी होऊ शकतात.

पाकिस्तानमध्ये देखील भारताता होणारी SCO मिटींग्समध्ये सहभागी होण्यासाठी चर्चा सुरू झाली आहे. भारतकडून पाकिस्तानचे रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ आणि विदेश मंत्री बिलावल भुट्टो जरदारी यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. SCO अंतर्गत डिफेंस मिनिस्टर्सची मिटींग 27-29 एप्रिल आणि फॉरेन मिनिस्टर्सची मिटींग 4-5 मेला गोव्यात होणार आहे.

शांघाय कोर्पोरेशन ऑर्गेनायझेशनची स्थापना 2001 मध्ये झाली. ती एक पॉलिटिकल, इकोनॉमिकल आणि सिक्योरिटी ऑर्गेनायझेशन आहे. भारत, रशिया, चीन आणि पाकिस्तानसह एकुण 8 स्थायी सदस्य आहेत. सुरूवातीला यात 6 सदस्य होते. 2017 मध्ये भारत आणि पाकिस्तानही यात सहभागी झाले. आर्मिनिया, अजरबैजान, कंबोडिया, नेपाल, श्रीलंका आणि तुर्की SCO चे डायलॉग पार्टनर आहेत. 4 देश- अफगानिस्तान, इराण, बेलारूस आणि मंगोलिया याचे ऑब्जर्वर सदस्य आहेत.

Tags

follow us