Pahalgam Terror Attack : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील (Pahalgam Terror Attack) तणाव प्रचंड वाढला आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने काही (India Pakistan Tension) निर्णय घेतले आहेत. सिंधू पाणीवाटप करार स्थगित केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. यातच आता पाकिस्तानातून एक मोठी बातमी आली आहे. पाकिस्तानी मीडियात दावा करण्यात आला आहे की भारताने अचानक झेलम नदीत पाणी सोडले आहे. यानंतर मुजफ्फराबादमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती न देता भारताने झेलम नदीत पाणी सोडले असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
चकोठी सीमेपासून मुजफ्फराबाद शहरापर्यंत पाण्याची पातळी वाढल्याने हट्टिया बाला, घारी दुपट्टा आणि मझोई या गावांत भीतीचं वातावरण आहे. स्थानिक प्रशासनाने हट्टियन बालामध्ये पाणी इमर्जन्सी घोषित केली आहे. पाणी उत्तर काश्मीरमधील बारामु्ल्ला जिल्ह्यात शिरले आणि नंतर पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरातील चकोठी भागात आले.
बलूचिस्तान, खैबर पख्तूनख्वा अन् LOC.. तिन्ही बाजूंनी घेरलाय पाकिस्तान
भारत सरकारने सिंधू पाणीवाटप करार स्थगित (Indus Water Treaty) करण्याची माहिती पाकिस्तान सरकारला दिली आहे. अधिसूचनेत म्हटले आहे की सिंधू पाणीवाटप करार स्थगित करण्यात आला आहे. यामुळे आता भारत पाकिस्तानची कोणतीही परवानगी न घेता सिंधू नदीवर धरण, बंधारे बांधण्यास स्वतंत्र आहे. जम्मू काश्मीरला टार्गेट करून पाकिस्तानकडून सुरू असलेला दहशतवाद सिंधू पाणीवाटप करारातील भारताच्या अधिकारात अडथळा आणतो. सद्भावनेसह कराराचा सन्मान करण्याची जबाबदारी आवश्यक असताना पाकिस्तान मात्र सातत्याने दहशतवादी कारवाया करत आहे, असे जल संसाधन मंत्रालयाच्या सचिव देबाश्री मुखर्जी यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे काल (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्यात या अतिरेक्यांनी हिंदू धर्मियांना टार्गेट केलं. त्यांची धार्मिक ओळख आणि नावं विचारून (Jammu Kashmir Attack) त्यांना गोळ्या घातल्या. भारताचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जाणारं पहलगाम रक्तरंजित झालं. या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
“जर भारतानं आमचं पाणी रोखलं तर आम्ही..”, पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफांची पोकळ धमकी