Download App

Pakistan : आमच्याकडे निवडणुका घ्यायला पैसे नाहीत; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याचे विधान

  • Written By: Last Updated:

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, देशाच्या अर्थ मंत्रालयाकडे निवडणुका घेण्यासाठी पैसे नाहीत, असे विधान केले आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्वाजा आसिफ यांनी आंतरराष्ट्रीय मीडियाला दिलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ख्वाजा आसिफ यांचे हे वक्तव्य आले आहे.

ज्यामध्ये निवडणूक आयोगाने पाकिस्तानच्या पंजाबमध्ये होणाऱ्या प्रांतिक निवडणुका पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत. देशातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे. ज्याला इम्रान खान यांच्या पक्षाकडून विरोध केला जात आहे.

निवडणुकांपूर्वी कर्नाटकात भाजपची मोठी खेळी; मुस्लिमांचं आरक्षण दोन जातीत विभागलं

पाकिस्तानच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या तत्कालीन सरकारांनी 14 आणि 18 जानेवारीला खैबर पख्तूनख्वा प्रांतातील विधानसभा विसर्जित केल्या होत्या. यानंतर 1 मार्च रोजी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा विसर्जित झाल्यानंतर 90 दिवसांच्या आत दोन्ही राज्यांमध्ये निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते.

राहुल गांधी स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजतात, भाजपचा हल्लाबोल

या अंतर्गत पंजाबमध्ये एप्रिल महिन्यात आणि खैबर पख्तूनख्वामध्ये मे महिन्यात निवडणुका होणार होत्या, मात्र आता निवडणूक आयोगाने या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. त्यावर ख्वाजा आसिफ यांनी निवडणुका घेण्यासाठी पैसे नाहीत, यावरुन पाकिस्तानच्या पीएमएलएन सरकारला सध्या निवडणुका घ्यायच्या नसल्याचं स्पष्ट होत असून इम्रान खानसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

पत्रकार परिषदेत ख्वाजा आसिफ यांनी पीटीआय प्रमुख इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की इम्रानने माजी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाळ वाढवला आणि नंतर बाजवा यांना सत्तेतून बाहेर काढल्याचा आरोप केला.

Tags

follow us