Download App

भारताच्या ‘बेस्ट फ्रेंड’ ची आगळीक! ड्रॅगनचं ऐकून पाकिस्तानला मदत

  • Written By: Last Updated:

Pakistan Russia Oil : भारताचे शेजारी राष्ट्र पाकिस्तान आणि चीन प्रत्येकवेळी भारताला काही ना काही कुरघोड्या करून डिवचण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, या कुरघोड्यांना भारताककडून वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिले जाते. परंतु, आता भारताला त्याचा बेस्ट फ्रेंड म्हणवणाऱ्या रशियाने (Russia) धोका दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे रशियाने चीनच्या (China) सांगण्यावरून भारताचा कट्टर शत्रू पाकिस्तानला (Pakistan) स्वस्तात कच्चे तेल देत मदतीचा हात पुढे केला आहे. रशियाच्या कृतीमुळे पुतिन भारतासोबत दुहेरी खेळ तर खेळत नाहीये ना? असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे.

Abdul Sattar : आधीच मंत्रिपद जाण्याच्या चर्चा, त्यात सत्तार सापडले नव्या वादात

आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये ४५ हजार मेट्रिक टन कच्चे तेल असलेला टँकरथेट कराचीला पोहोचला आहे. खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी ही माहिती दिली. 20 एप्रिल रोजी पाकिस्तानने रशियाकडून कच्च्या तेलाची पहिली तुकडी कमी किमतीत खरेदी केल्याचे शरीफ यांनी सांगितले आहे. रशियाकडून अशाप्रकारे मदत करणे ही रशिया-पाकिस्तान संबंधांची नवीन सुरुवात मानली जात आहे.

देशाला दिलेले आणखी एक वचन पूर्ण केले
दरम्यान, रशियाकडून पाठवण्यात आलेल्या या मदतीनंतर आपण देशाला दिलेले आणखी एक वचन पूर्ण केल्याचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले. रशिया आणि पाकिस्तानमधील नवीन संबंधांची ही सुरुवात असल्याचेही शरीफ म्हणाले.

लाठीचार्ज केलेले हे वारकरी हिंदू नाही का? रोहित पवारांचा सरकारला सवाल

नागरिकांना दिलासा
आर्थिक संकटांचा सामना करत असलेल्या पाकिस्तामध्ये अनेक गोष्टींच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे देशातील करोडो नागरिकांना फटका बसला आहे. पाकिस्तानमध्ये सध्या एक लिटर पेट्रोलची किंमत जवळपास 262 पाकिस्तानी रुपये आहे. आर्थिक संकटामुळे तेथे पेट्रोलसाठी एवढी मोठी रक्कम भरणे सर्वसामान्यांना कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत रशियाकडून स्वस्त तेल मिळणे हे पाकिस्तानसाठी वरदानापेक्षा कमी नाहीये. रशियाकडून स्वस्तात तेल मिळाल्याने आगामी काळात पाकिस्तान रशियाकडून दररोज एक लाख बॅरल कच्चे तेल खरेदी करू शकेल, अशी आशा पाकिस्तानचे आर्थिक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. दोन्ही देशांतील हा तेल करार चीनच्या भारतातून पाणी काढण्याच्या प्रयत्नांचा परिणाम मानला जात आहे.

WTC Final : पराभवानंतर सचिनचा सवाल, अश्विनला का नाही खेळवलं?

भारताला मोठा धक्का
पाकिस्तानला रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल मिळणे हा भारतासाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे. रशियाच्या या मदतीनंतर आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर याची चर्चा होत आहे. त्यानुसार आता रशियापासून स्वातंत्र्य वाढवून पाकिस्तान भारताचे नुकसान करू शकतो, असे अनेकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे रशियाचे म्हणणे आहे की, चीन किंवा पाकिस्तान यांच्याशी असलेल्या मैत्रीची भारताशी असलेल्या संबंधांशी तुलना होऊ शकत नसल्याचे रशियाने म्हटले आहे. रशियाचे भारतासोबत ऐतिहासिक संबंध आहेत, ज्याचा इतर कोणत्याही देशाच्या संबंधांवर परिणाम होणार नसल्याचे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅवरोव्ह यांनी म्हटले आहे.

Ashadhi Wari 2023 : तुकारामांच्या पालखीत परदेशी पाहुणा

Tags

follow us