Download App

Pakistan : पाकिस्तानात पहिल्यांदाच पेट्रोल 300 पार; सरकारने घेतला मोठा निर्णय

Pakistan : पाकिस्तानात महागाईने जनता हैराण झाली आहे. त्यातच आता सरकारने घेतलेल्या निर्णयाने महागाईच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या कार्यवाहक सरकारने पेट्रोल 14.91 रुपये प्रति लिटर आणि हाय स्पीड डिझेल दरात 18.44 रुपये वाढ केली आहे.

पाकिस्तानी अर्थमंत्रालयाने याबाबत एक ट्विट केले आहे. पेट्रोलची किंमत 305.36 रुपये प्रति लिटर आणि एचएसडी 311.84 रुपये झाले आहे. केरोसीनच्या दरात कोणताही बदल केलेला नाही असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. स्थानिक वृत्तानुसार, पाकिस्तानात पेट्रोलची किंमत 290.45 रुपयांवरून 305.36 रुपये प्रति लिटर झाली आहे. या व्यतिरिक्त 293.40 रुपये दराने विक्री होणारे डिझेलचे दर आता 311.84 रुपये झाले आहेत. या दरवाढीमुळे पाकिस्तानात पहिल्यांदाच इंधनाच्या किंमती 300 रुपयांच्या पुढे गेली आहे.

इलॉन मस्कची मोठी घोषणा! फोन नंबरशिवाय ट्विटरवर करता येणार फोन

याआधी 15 ऑगस्ट रोजी इंधनाच्या किंमती 20 रुपयांना वाढल्या होत्या. त्यानंतर थोड्याच दिवसांत पुन्हा दरवाढ करण्याड आली आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयांत 1.09 रुपये घसरण झाली आहे. सध्या एक डॉलरची किंमत 306 पाकिस्तानी रुपये आहे. पाकिस्तानात सध्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. महागाई प्रचंड वाढली आहे. अर्थव्यवस्था ढासळली आहे. या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी कर्ज घ्यावे लागत आहे. या कर्जातूनच अडचणी आणखी वाढल्या आहेत. आधीच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी नव्याने कर्ज काढावे लागत आहे.  महसूल वाढविण्यासाठी सरकारने आता नागरिकांना त्रासदायक ठरणारे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे लोकांच्या संतापात मात्र वाढ होत चालली आहे.

Tags

follow us