Download App

पाकिस्तानातील Punjab University होळी साजरी करणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ला, 15 जखमी

पाकिस्तान : पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदू समुदायातील १५ कॉलेज विद्यार्थ्यांवर (Attack on Hindu students ) कट्टर इस्लामिक विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी (Hindu students ) सोमवारी पंजाब विद्यापीठात (Punjab University) हल्ला केला. या घटनेमध्ये सुमारे १५ विद्यार्थी जखमी झाले. (Holi 2023 Pakistan) पंजाब विद्यापीठाच्या लॉ कॉलेजात सुमारे ३० हिंदू विद्यार्थी होळी साजरी करण्यासाठी एकत्र जमले होते.

विद्यापीठात विद्यार्थी आणि प्रत्यक्षदर्शी काशिफ ब्रोही यांनी दिलेल्या माहितीनुसार की, विद्यार्थी लॉ कॉलेजच्या लॉनमध्ये एकत्र जमले असताना इस्लामी जमियत तुलबा (IJT) च्या कार्यकर्त्यांनी त्यांना होळी साजरी करण्यापासून थांबविले. ज्यामुळे तुफान हाणामारी झाली आणि या घटनेमध्ये १५ हिंदू विद्यार्थी जखमी झाले आहेत.

नेमकं काय घडल

पंजाब विद्यापीठाच्या पीयू लॉ कॉलेजमध्ये सुमारे ३० कॉलेज विद्यार्थी होळी खेळण्यासाठी एकत्र जमले होते. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी यासाठी कॉलेज प्रशासनाची परवानगी देखील घेतली होती. सिंध काऊन्सिलचे सरचिटणीस काशिफ ब्रोही म्हणाले- कार्यक्रमादरम्यान अचानक आयजेटीचे लोक त्याठिकाणी आले. त्यांनी भांडण सुरू केले.

Sunny Leone मुळे पाकिस्तानात राजकीय वातावरण चिघळले ; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

होळी साजरी केल्याची माहिती त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे मिळाली. या हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर मोठ्या निदर्शने केली होती. याठिकाणी अनेक सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थाना मारहाणही केली. त्यांनी आंदोलन करू नये म्हणून सुरक्षारक्षकांनी सुमारे 5- 6 विद्यार्थ्यांना व्हॅनमध्ये टाकले.

या घटनेत जखमी झालेला विद्यार्थी खेत कुमार म्हणाला की, आम्ही कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर आयजेटी कार्यकर्त्यांच्या वागणुकी विरोधात आंदोलन करत होतो. यानंतर कॉलेजचे सुरक्षारक्षक तिथे आले आणि त्यांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरूवात केली. आम्ही पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी पोहोचलो पण त्यांनी अद्याप गुन्हा नोंदविला नाही.

Tags

follow us

वेब स्टोरीज