Download App

पाकिस्तानात हिंसाचार! इम्रान खान समर्थकांच्या आंदोलनाला गालबोट; 6 सुरक्षा जवानांचा मृत्यू…

पाकिस्तानात इम्रान खान समर्थकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून या हिंसाचारात 6 सुरक्षा जवानांचा मृत्यू तर 100 जवान गंभीर जखमी झाले आहेत.

Imran Khan News : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) समर्थकांनी जोरदार आंदोलन केलंय. या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं असून इम्रान समर्थकांच्या हिंसक आंदोलनात 6 सुरक्षा जवानांचा मृत्यू झाला असून 100 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या केंद्र सरकारने लष्कर पाचारण केलं असून इम्रान समर्थकांवर गोळीबार करण्याचा आदेश जारी केलायं.

लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रांवर डोळे झाकून सही करणारा व्यक्तीच मुख्यमंत्री होणार, नाना पटोलेंचा हल्लाबोल

माध्यमांच्या रिपोर्टनूसार इम्रान खान समर्थक इस्लामाबादच्या डी चौकात पोहोचले असून याच भागात राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, सर्वोच्च न्यायालय आणि संसद भवन आहे. जोपर्यंत इम्रान खानची सुटका केली जात नाही तोपर्यंत आमचं इस्लामाबादमध्ये आंदोलन सुरुच राहणार असल्याचा पवित्रा घेतलायं. त्यामुळे आता पाकिस्तान सरकारसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. विशेष म्हणजे इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून जोपर्यंत इम्रान खान स्वत: येत पुढील रणनीतीची खुलासा करीत नाही, तोपर्यंत आंदोलक इस्लामाबादेतून हटणार नाहीत.

दिल्लीतून मुख्यमंत्रि‍पदाच्या नावावर शिक्कामोर्तब! अमित शाह घोषणा करणार, एकनाथ शिंदे नाराज?

दरम्यान, आंदोलकांना डीचौकापर्यंत येण्यास मज्जाव करण्यात आला असून पीटीआय नेत्यांची मनधरणी करण्यात येत आहे. आम्ही कोणत्याही प्रकारची हिंसेची अपेक्षा ठेवत नसून एक गुप्त नेतृत्व या आंदोलनाच नेतृत्व करीत असल्याचं पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी स्पष्ट केलंय.पीटीआय पक्षाने रविवारी खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर आणि इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या जोरदार प्रदर्शनानंतर शहबाज शरीफ सरकारने लष्कराला पाचारण केलंय. वेळ पडल्यास कर्फ्यू लागू करावा लागला तरीही आम्ही आंदोलन संपवणार असल्याचं पाकिस्तान सरकारने स्पष्ट केलंय.

पंजाब पोलिसांच्या माहितीनूसार पीटीआय आंदोलकांसोबत झालेल्या हिंसेमध्ये इस्लामाबादमधील हकला इंटरचेंजवर एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर 100 पेक्षा अधिक सुरक्षा जवान जखमी झाले असल्याचं गृहमंत्री नकवी यांनी सांगितलंय.

follow us