Download App

Pakistan : इम्रान खानच्या घराला पुन्हा पोलिसांचा घेरा; 30 ते 40 दहशवादी असल्याचा संशय

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. माजी पंतप्रधान यांच्या लाहोरमधील जमान पार्क निवासस्थानाला पोलिसांनी वेढा घातला असून पंजाब प्रांताच्या अंतरिम सरकारने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या निवासस्थानी लपलेल्या 40 दहशतवाद्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. तसेच इम्रान खान यांच्या घरात दहशतवादी लपल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.

Marathi Theater Council नवनिर्वाचीत अध्यक्ष प्रशांत दामलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पीटीआयने दहशतवाद्यांना ताब्यात घ्यावे, तसं नाही झाल्यास कायद्याने त्यांना ताब्यात घ्यावं लागणार असल्याचं मंत्री आमिर मीर यांनी सांगितलं होतं. सरकारला या दहशतवाद्यांच्या माहिती होती, त्यानूसार विश्वसनीय सुत्रांची माहिती सरकारला मिळाली होती. एजन्सींनी इम्रान खान यांच्या निवासस्थानी दहशतवादी असल्याचा दावा केला आहे.

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वर मंदिराचे शुद्धीकरण, महाराष्ट्र बंदची हाक

पीटीआय प्रमुख एक वर्षांपेक्षा अधिक काळ लष्कराला लक्ष्य करत आहेत. इम्रान खान यांना अटक करण्यापूर्वी पीटीआयच्या दहशतवाद्यांनी हल्ल्याची प्लॅन आखला होता. योजना आखली होती. याचीही आम्हाला माहिती मिळाली आहे.

Gutami Patil च्या कार्यक्रमात राड्याचं सत्र थांबेना, डान्स शो दरम्यान पत्रकारांवर हल्ला

९ मे रोजी होणारे हल्ले आणि हिंसक निदर्शनांबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले आहे. तसेच, अंतरिम मुख्यमंत्री मोहसीन नकवी यांनी पंजाब पोलिसांना मोकळीक दिली आहे. तसेच कमांडर हाऊसवर हल्ला करणारे जमान पार्कमधील लोकांच्या संपर्कात होतं. या हल्ल्यातील लोकांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचं आमिर मीर यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, लष्करी छावण्यांवर हल्ला करणाऱ्यांचा खटला लष्करी न्यायालयात चालवला जाणार असल्याचं मंत्री आमिर मीर यांनी म्हटलंय.

Tags

follow us